wakhan corridor-Pakistan गेल्या काही दशकांत भारताशी सतत युद्ध करून हरणारा पाकिस्तान एका नव्या युद्धाला सामाेरे जाण्याची तयारी करताे आहे, असे वृत्त आहे. पाकिस्तान आजवर भारताच्या विराेधात दहशतवादी उभे करीत आला आहे. हे करीत असताना ताे कंगाल झाला, पण त्याने तिकडे लक्ष दिले नाही. हे दहशतवादी आता त्याच्यावरच उलटले आहेत. अमेरिकेलाही यांना आवरणे शक्य झाले नाही. त्यांना म्हणजे अफगाणी पख्तूनांना संपविण्यासाठी पाकिस्तान युद्ध पुकारण्याचा विचार करताे आहे. गेल्या काही महिन्यांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर सातत्याने अफगाणिस्तानचे दहशतवादी हल्ले करीत आहेत. जे पाकिस्तानने भारतासाेबत केले तेच आता त्यांच्यासाेबत हाेऊ लागले आहे. अफगाणिस्तानचे दहशतवादी एका मागाेमाग एक हल्ले करून पाकिस्तानला बेजार करीत आहेत. अफगाणी (पख्तून) घुसखाेर पाकिस्तानमधील पख्तूनबहुल भागात घुसखाेरीही करतात, असा पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर आराेप आहे. यामुळे पाकिस्तानला आता या तालिबानी दहशतवाद्यांशी युद्ध करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याच पाकिस्तानने अमेरिका-अफगाणिस्तान साेडून जात असताना याच तालिबान्यांना आश्रय दिला हाेता, त्यांना प्रशिक्षण दिले हाेते, त्यांना पुन्हा अफगाणिस्तानमध्ये पाठविले हाेते. अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर आता हेच दहशतवादी पुन्हा पाकिस्तान सीमेवर आले आहेत. त्यांचा पाकिस्तानवर आराेप आहे की, काही अ\गाण प्रदेश पाकिस्तानने बळकावला आहे, ताे परत मिळावा म्हणून तालिबान्यांची धडपड चालू आहे. निर्मितीपासूनच पाकिस्तान भारताबराेबर कुरापती काढत आला आहे. भारताविराेधात दहशतवादाला पाेसण्यातच पाकच्या कूटनीतिज्ञांचा वेळ खर्च हाेत आला आहे. पण हे तालिबानी दहशतवादी आता खुद्द पाकिस्तानलाच बेजार करू लागल्यामुळे त्यांना संपविण्यासाठीच युद्ध पुकारण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. यामुळे पाकिस्तानला आता या तालिबानशीच दाेन हात करावे लागणार, अशी स्थिती निर्माण हाेते आहे. तालिबानी दहशतवाद्यांविराेधी करावयाच्या कारवाईची सुरुवात म्हणून पाकिस्तानने वाखान काॅरिडाेर ही चिंचाेळी पट्टी ताब्यात घेण्याच्या विचारात आहे.
काॅरिडाेर ही पट्टी ब्रिटिश मुत्सद्दी ड्युरॅण्ड यांनी रशियन वर्चस्वाखालील प्रदेश आणि ब्रिटिश साम्राज्यातील प्रदेश यांच्या सीमा एकमेकींना स्पर्श करू नयेत, म्हणून निर्माण केलेली कृत्रिम चिंचाेळी बफर पट्टी आहे. दाेन महासत्तांमध्ये असा चिंचाेळा भाग असल्यास त्या दाेन महासत्तांत संघर्षाचे प्रसंग आणि मुद्दे निर्माण हाेत नाहीत. आज हा भूभाग अफगाणिस्तानचा हिस्सा आहे. ताे आज ताजिकिस्तान आणि पाकिस्तान यांना वेगळा करताे आहे. बफर स्टेटमध्ये दाेन्ही महासत्तांच्या सेना असत नाहीत. त्यामुळे दाेन महाशक्तींचा परस्पर संपर्कच हाेत नाही. काही वादाचे मुद्दे निर्माण झाले तर चर्चा करून त्यांचा निपटारा करणे शक्य हाेते आणि बहुधा त्या दाेन देशांत युद्धासारखी परिस्थिती निर्माण हाेत नाही. वाखान काॅरिडाेर ही जमिनीची चिंचाेळी पट्टी मानव निर्मित आहे. हा चिंचाेळा भूभाग अफगाणिस्तानच्या बादखशान प्रांताचा हिस्सा आहे. हिच्या एका बाजूला आज जाे ताजिकिस्तान देश आहे, ताे भूभाग एकेकाळी साेव्हिएत रशियाचा भाग हाेता. पट्टीच्या दुसऱ्या बाजूला आज पाकिस्तानचा खैबर पख्तूनख्वा आणि गिलगिट-बाल्टिस्तान प्रांत आहे.
हा संपूर्ण भाग आज जरी व्याप्त असला, तरी एकेकाळी हा भूभाग ब्रिटिशांच्या हाेता. यातील गिलगिट-बाल्टिस्तान हा प्रदेश काश्मीरचा भाग असून आज ताे व्याप्त काश्मीरमध्ये येताे. ही पट्टी समुद्रसपाटीपासून 4923 मीटर उंच आहे. क्षाखान हा भूभाग आज पाकिस्तानमध्ये अचानक चर्चेत आला आहे. हा चिंचाेळा भूभाग अ\गाणिस्तानच्या नकाशात शेपटीसारखा उठून दिसताे. ती 350 किलाेमीटर लांब आणि 34 किलाेमीटर रुंद आहे. आजची भूराजकीय स्थिती सांगायची तर या पट्टीच्या उत्तरेला ताजिकिस्तान, दक्षिणेला पाकिस्तान (ज्यात व्याप्त काश्मीर आहे) आणि दूर पूर्वेला चीन आहे. हे सर्व भाैगाेलिक विशेष असलेली ही पट्टी आज जगातला एक संघर्ष बिंदू म्हणून पुढे येते आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यातील तणावयुक्त भूभाग म्हणून वाखान पट्टीकडे भारत पाहू शकत नाही. कारण पट्टी व्याप्त काश्मीरला लागून आहे. त्यामुळे हा मुद्दा भारतासाठीही महत्त्वाचा ठरताे. आज भारताचे ताजिकिस्तानशी सामरिक, सामंजस्याचे आणि घनिष्ठ संबंध आहेत. 1995 ते 2016 या काळात ताजिकिस्तानचे अध्यक्ष एमाेमाली यांनी सहा वेळा भारताला भेट दिली आहे.
अफगाणिस्तानमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर तालिबानी राजवटीशीही भारताचे स्नेहाचे संबंध निर्माण हाेत आहेत. याबाबत पुढाकार तालिबानी राजवटीने घेतला आहे, हे विशेष! wakhan corridor-Pakistan ब्रिटिश मुत्सद्दी ड्युरॅण्ड यांच्या प्रयत्नातून आखल्या गेलेल्या ड्युरॅण्ड रेषेला अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधली सीमा म्हणून ओळखले जाते. ही 2,640 किलाेमीटर (1,640 मैल) लांब आहे. हिचे पश्चिम टाेक इराणच्या सीमेपर्यंत आणि पूर्वेकडील टाेक चीनच्या सीमेपर्यंत जाते. आज निर्माण झालेली समस्या अफगाणिस्तानच्या ईशान्य आणि दक्षिणेकडील प्रांतांमधून खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान आणि उत्तर आणि पश्चिम पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तानच्या (व्याप्त काश्मीर) प्रदेशाचे सीमांकन न हाेणे यामुळे आहे. ड्युरॅण्ड लाईनशी ही समस्या संबंधित नाही. वाखान काॅरिडाेर हा त्या प्रदेशातील संभाव्य संघर्ष बिंदू म्हणून समाेर येताे आहे. मुख्य म्हणजे ही भारताची चिंता वाढविणारी बाब ठरते आहे. अ\गाणिस्तानमधील तालिबानी राजवट भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यास उत्सुक आहे. भारत आणि चीन यांच्यातील आजचे संबंध पाहता वाखान पट्टी आहे तशीच राहणे महत्त्वाचे आहे.
पाकिस्तानने तिरिमिरीत येऊन ही पट्टी नष्ट केली तर नव्याने सीमांकन हाेईल. महासत्तांच्या सीमा नव्याने एकमेकींना भिडतील. पाकिस्तान मध्य आशियाशी जाेडले गेले तर ते पाकिस्तानला हवे आहे, पण ही बाब भारतासाठी साेयीची नाही. त्यामुळे या क्षेत्रात संघर्ष उभा झाला तर भारत बघ्याची भूमिका घेऊ शकणार नाही. पाकिस्तानच्या वृत्तसृष्टीत सध्या हा विषय चविष्टपणे हाताळला जाताे आहे. ताजिकिस्तान आणि पाकिस्तानमध्ये आडवी असलेली अ\गाणिस्तानची ही शेपटीसदृश पट्टी नष्ट करावी आणि तिचे रूपांतर एका नवीन व्यापारी मार्गात करावे, असा विषय आग्रहाने पुढे आणला जाताे आहे. असे झाल्यास अफगाणिस्तानचा चीनशी आज असलेला संबंधच संपेल. अशाप्रकारे मध्य आशियाला जाेडणारा नवीन व्यापारी मार्ग तयार झाला तर पाकिस्तानची आर्थिक दुरवस्था दूर हाेईल, असा विश्वास पाक वृत्तसृष्टीत व्यक्त केला जाताे आहे. भारताने ताजिकिस्तानमध्ये बऱ्यापैकी गुंतवणूक केली आहे. या दाेन देशांत उभयपक्षी उपयाेगी पडावेत असे सामरिक हितसंबंधही निर्माण झाले आहेत. पाकिस्तानने वाखान काॅरिडाेर नष्ट करण्याचे दु:साहस केले तर भारत बघ्याची भूमिका घेऊ शकणार नाही.