तरुण भारत लाईव्ह । ६ जानेवारी २०२३। लांब आणि घनदाट केस कोणाला आवडत नाही. पण वाढत्या जीवनशैलीत केसांची योग्य काळजी घेणं आणि केसांची निगा राखण शक्य होत नाही त्यामुळे केस गळणे, खुंडने, केसांची वाढ न होणे, केस खराब होणे, केसांमध्ये कोंडा होणे या सारख्या समस्या होऊ लागतात. जर आपण आपल्या केसांची योग्य प्रकारे काळजी घेतली तर केसगळती आणि यासारख्या अनेक समस्यांमधून तुम्हाला बचाव करता येईल. आपण आज जाऊन घेणार आहोत कि कोणते उपाय केल्याने आपले केस लांब आणि घनदाट होतील.
केसांना तेल लावणे: केसांना व्यवस्थित तेल लावून केसांना मालिश करणे हा केस वाढवण्याचा उत्तम पर्याय आहे यासाठी तुम्हला केस धुण्याच्या एक तास आधी खोबरेल तेलाने मालिश करायची आहे. एकांतासनंतर केस कोमट पाण्याने धुवावे. लक्षात ठेवा जास्त गरम तसेच जास्त थंड पाण्याने केस धुवू नये. केस धुवायला कोमट पाण्याचा वापर करावा.
कोरफड लावणे: केसांना कोरफड लावणे हा अतिशय उत्तम उपाय आहे. कोरफड ने केस मऊ होतात सोबतच केसांची वाढ होण्यास देखील मदत होते. घरात कोरफड असेल तर त्याचा गर काढून तो केसांना मुळापासून लावावा. याचप्रकारे बाजारात मिळणारे कोरफड जेल तुम्ही लावू शकता. केस धुण्याच्या अर्धतास आधी कोरफड केसांना मुळापासून लावावे आणि अर्धातासानंतर केस कोमट पाण्याने धुवावे.
केसांना दही लावणे: केसांना दही लावल्याने कोंड्यापासून केसांची सुटका होते. आणि केस घनदाट होण्यास मदत होते. केस धुण्याच्या १५ मिनिटे अगोदर केसांना दही लावावे नंतर एका तासानंतर केस धुवावे. यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो.