एलसीबी पथकाने सापळा रचून एमपीडीएचा वॉन्टेड गुन्हेगारला पुणे येथून केले जेरबंद

जळगाव : दाखल तीन गुन्ह्यातील फरार तसेच एमपीडीए कारवाईसाठी पाहिजे असलेला सराईत गुन्हेगाराच्या एलसीबीच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पुणे येथील पिंपरी चिंचवड परिसरातील थेरगाव येथुन ताब्यात घेतले. योगेश उर्फ रितीक डिंगबर कोल्हे (वय ३२, रा. आसोदा) असे त्याचे नाव आहे.

योगेश याच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन तर मध्यप्रदेशातील नेपानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तो वॉन्टेड असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना त्याचा

शोध घेण्याचे सुचित करत मार्गदर्शन केले होते. त्यानुसार एलसीबीचे पथक नियुक्त करुन ते तपासकामी खाना केले. पथकाने अहमदनगर, पुणे येथे तपासचक्र फिरविले असता हा संशयित पिंपरी चिंचवड परिसरात असल्याची तसेच तो थेरगाव परिसरात त्याचे मित्र व नातेवाईक यांच्याकडे अस्तीत्व लपवून वास्तव्य करत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. पथकाने पुणे थेरगाव परिसरात पहाटे त्याचे नातेवाईककडे येत असताना त्याला भरपावसात सापळा रचुन पथकाने शिताफिने रविवार, ७ रोजी पहाटे ताब्यात घेत जळगाव तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलीस अंमलदार जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, ईश्वर पाटील यांच्या पथकाने केली.