Jalgaon News: जिल्ह्यात 56 गावांमध्ये पाणी दूषित पाणी

आरोग्य विभागाच्या तपासणीत जळगाव तालुक्यात सर्वाधिक दूषित पाणीपुरवठा जिल्हाभरात जुलै महिन्यात झालेल्या पाण्याच्या नमुने तपासणीत जळगाव तालुक्यात 101 ठिकाणी पाण्याची तपासणी करण्यात आली. त्यात जिल्ह्यात सर्वाधिक 13 पाण्याचे नमुने दुषित आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकूण 56 गावांमध्ये पाण्याचे नमुने दुषित असल्याचे तपासणीतून समोर आले आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून दर महिन्याला पाण्याचे नमुण्याची तपासणी केली जाते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने साथ रोग नियंत्रण पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात व जिल्हास्तरावर पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अमळनेर तालुक्यात 140 तर धरणगाव 87, पाचोरा तालुक्यात 132 पाण्याचे नुमने आरोग्य विभागाकडून तपासण्यात आले. मात्र त्यात एकही पाण्याचा नमुना दुषित आढळलेला नाही. त्यानंतर यावल, रावेर तालुक्यात प्रत्येकी 6 पिंशरी दुषित पाणी आढळून आले आहे.

जिल्हाभरात पाण्यातील टीसीएलचीही तपासणी

तसेच जिल्हाभरात पाण्यातील टीसीएलची तपासणी केली जाते. जिल्ह्यात 460 ठिकाणी मीहन्याभरात टीसीएल नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. त्यात 57 नमुने 20 टक्यापेक्षा कमी आढळले. जिल्ह्यात सरासरी 12.4 टक्के नमुने 20 टक्क्यापेक्षा कमी टीसीएल असलेले नमुने स्पष्ट झाले. दोन तालुक्यात सर्वात जास्त दूषित पाणी
जिल्ह्यात दोन तालुक्यात तपासणीत सर्वाधिक दुषित पाण्याचे नमुने आढळून आले आहेत. त्यात जळगाव व जामनेर या तालुक्यात दुषित पाण्याचे नमुने तपासणीत निदर्शनास आले आहेत.