जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सूर्य कोपला असून दोन दिवसापासून ढगाळ हवामान वगळता तापमान 44 अंशादरम्यान आहे. जिल्ह्यात डिसेंबरपासूच पाणीटंचाई जाणवत असून मन्याड. भोकरबारी, बोरी, अग्नावती प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. याशिवाय अंजनी 3.84 नुसार मृतसाठा तर बहुळा 14.78 टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील 96 लघू, 13 मध्यम तर 3 मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी 31.01 टक्के उपयुक्त जलसाठा असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 89 टँकरव्दारे 69 गावांसाठी पाणी पुरवठा केला जात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
गेल्यावर्षी सप्टेबर अखेर मान्सून काळात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पर्जन्यमान झाले होते. विशेषता चाळीसगाव तालुक्यातील बरेचसे लघू मध्यम प्रकल्प कोरडे ठाक असून मन्याड, बोरी, भोकरबारी व अग्नावती प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे.
चाळीसगाव पाठोपाठ अमळनेर तालुक्यात टँकरची संख्या
आजच्या स्थितीत चाळीसगाव तालुक्यात सर्वात जास्त 32 गावांसाठी 45 टँकर, यात विसापूर तांडा, अंधारी, करजगाव , कृष्णानगर, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्राम्हणशेवगे, घोडेगाव, हातगाव भिल्लवस्ती, पिंप्री बु.प्र.दे. खराडी, डोण दिगर, तळेगाव, न्हावे, ढोमणे, पिंपळगाव, माळशेवगे, शिंदी, चत्रभुज तांडा, शेवरी, बिलाखेड, शिरसगाव, जुनपाणी, पिंपळवाड निकुंभ, तळोंदे प्र.दे. चिंचगव्हाण, अभोणे ताडा, सुंदरनगर, नाईकनगर तांडा नं.1.
त्याखालोखाल अमळनेर तालुक्यात 17 गावांसाठी 22 टँकर, भडगाव तळबंद तांडा, वसंतवाडी, अंचळगाव, मळगाव, वडगाव बु. अशा 5 गावांत 5 टँकर, जळगाव तालुक्यात वराड, लोणवाडी बु. सुभाषवाडी, शिरसोली , कुसुंबे खुर्द अशा 5 गावांसाठी 7 टॅकर, जामनेर तालुक्यात रोटवद , मोरगाव, काळखेडे, एकुलती, खु आणि बुद्रुक अशा 5 गावे 5 टॅकर, पारोळा तालुक्यात खेडीढोक, हनुमंतखेडे, कन्हेरे चहुत्रे/ वडगाव प्र.अ. अशा 4 गावासांठी 4 टँकर, भुसावळ तालुक्यात कंडारी येथे 1 टॅकर, असे 69 गावांमध्ये 89 टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे.
129 गावांमध्ये 149 विहिर अधिग्रहण
पाणीटंचाई निवारणासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात असून ज्या ठिकाणी विहींवरून पाणीपुरवठा करणे शक्य आहे, तेथे विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. धरणगाव 13 गावे 14, जामनेर 10 10 , एरंडोल 6 6 भुसावळ 2 2, बोदवड 1 1 , रावेर 1 1, मुक्ताईनगर 7 7, पाचोरा 3 3, भडगाव 2, पारोळा 12 12 तर प्रत्येकी गावाच्या संख्येनुसार अमळनेर 31 गावांमध्ये 37, चाळीसगव 38 गावांमध्ये 47 विहिरी, चोपडा 3 गावे 6 विहिरी असे एकूण 129 गावांमध्ये 149 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
अंजनीत 5.17 तर 5 प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा
जिल्ह्यात तीन मोठे व 96 मध्यम लघू प्रकल्पांपैकी वाघूर, हतनूरसह पूर्व भागातील गुळ, मोर, मंगरूळ, तोंडापूर, अभोरा, सुकी असे मोजकेच 5-6 प्रकल्पांमध्ये सरासरी 40 ते 50 टक्के पाणीसाठा आहे. मात्र पश्चिम भागातील प्रकल्पात मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा या प्रकल्पात शून्य टक्के तर अंजनी प्रकल्पात जेमतेम 5.17 टक्के साठा आहे. जिल्ह्यातील प्रकल्पात सरासरी 3.22 टक्के उपयुक्त जलसाठा आहे. गेल्यावर्षी याच दिवशी सरासरी 39.81 टक्के जलसाठा नोंद असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
प्रकल्प उपयुक्त साठा
गिरणा 21.55
हतनूर 42.33
वाघूर 67.86
एकूण 37.94 टक्के.
–—
पश्चिम खानदेशात पाणीटंचाई स्थिती आटोक्यात
जळगाव जिल्ह्याच्या मानाने पश्चिम खानदेशात धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई स्थिती आटोक्यात आहे. धुळे जिल्ह्यातील दोन प्रकल्पात शून्य व कनोली 2.37 आणि बुराई 6.40 असा साठा या दोन प्रकल्पात असून अन्य प्रकल्पात 27 ते 37 टक्के पाणीसाठा आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्याची स्थिती बऱ्यापैकी असून गतवर्षी 61.25 टक्क्यावर असलेला नंदुरबार जिल्ह्यातील पाणीसाठा यावर्षी 70.14 टक्के असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
धुळे जिल्ह्यात मध्यम 6 तर 44 लघू प्रकल्पांपैकी सुलवाडे, सारंगखेडा बॅरेज, पांझरा, मालनगाव जामखेडी प्रकल्पात 27 ते 37 टक्केसह सरासरी 24.99 टक्के उपयुक्त जलसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी 34.43 टक्के जलसाठा होता. तर नंदुरबार जिल्ह्यात प्रकाशा बॅरेज 92.93 तर रंगावली प्रकल्पात 28.78 असा 70.14 टक्के उपयुक्त जलसाठा आहे.