---Advertisement---

राज्यभर पाऊस, पण जळगाव जिल्हा अद्याप तहानलेलाच; 21 गावांत होतोय टँकरने पाणीपुरवठा

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात मृगनक्षत्रात तब्बल आठ ते दहा दिवसानी पावसाने बरसात केली. आतापर्यंत गेल्या 24 तासात विविध प्रकल्प पाणलोट क्षेत्रात सरासरी 72 मि.मी.पावसाची नोंद झाली असून हतनूरमध्ये 1.50 दशलक्ष घनमिटर तर गिरणात 0.17 दलघमी पाण्याची प्रथमच आवक झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांचे दरवाजे बंद करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

गतवर्षी उशीरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे नोव्हेंबर डिसेंबरअखेर नदीनाले प्रवाहित होते. तर मोठ्या प्रकल्पांमधून कालवा समितीने निर्धारित केल्यानुसार वेळोवेळी सिंचन व पेयजलाचे आवर्तन सोडण्यात आले आहे. असे असले तरी उन्हाळ्याच्या तापमान व बाष्पीभवनामुळे मान्सूनदरम्यान तीन मध्यम प्रकल्पात शून्य टक्के तर तीन प्रकल्पांची मृत साठयाकडे वाटचाल झालेली आहे. सदयस्थितीत 21 गावांसाठी 25 टँकरने पाणीपुरवठा केला जात असून 46 गावांसाठी 11 विहींरीचे अधिग्रहण असल्याचे आहे.

21 गावांसाठी 25 टँकरने पाणीपुरवठा


जळगाव जिल्ह्यात दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान टँकरची मागणी केली जाते. परंतु यावर्षी 15 एप्रिलपर्यंत टँकरची मागणी नव्हती. परंतु त्याच आठवडयात अमळनेर तालुक्यात दोन व भडगाव तालुक्यात एक अशी तीन टँकरच्या मागणी करण्यात आली. सद्यस्थितीत जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ 21 गावांसाठी 25 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात जामनेर 4 गावे 18हजार 356 लोकसंख्येसाठी 4 खासगी व 1 शासकिय असे 5 टँकर, तसेच 7 गावांसाठी 4 विहिरीं अधिग्रहीत आहेत. भुसावळ तालुक्यात 3600 लोकसंख्येच्या 2 गावांसाठी 2 खासगी, मुक्ताईनगर 9528 लोकसंख्येच्या 9 गावांसाठी विहीरी अधिग्रहित आहेत. बोदवड 2670 लोकसंख्येच्या 1 गावासाठी 1 टँकर, पारोळा 16हजार 437 लोकसंख्येच्या 2 गावे 2 टँकर, एरंडोल 5676 लोकसंख्या असलेल्या 1 गावासाठी एक विहिर अधिग्रहित, पाचोरा 22हजतार 790 लोकसंख्येसाठी 1 गाव 1 विहीर अधिग्रहीत तसेच 2 खासगी टँकर, चाळीसगाव तालुक्यात 24 हजार 112 लोकसंख्येच्या 7 गावांसाठी 5 खासगी, 2 शासकिय असे 7 टँकर तर 6 गावांसाठी विहीर अधिग्रहित आहेत. भडगाव 1200 लोकवस्ती 1 गावासाठी 1 टँकर, अमळनेर 11हजार 647 लोकसंख्येच्या 6 गावांसाठी 6 टंॅकर व 7 गावांसाठी 2 विहीर अधिग्रहित आहेत. चोपडा तालुक्यात 5034 लोकसंख्येसाठी 7 गावांसाठी 2 विहीरी अधिग्रहीत आहेत.

चार तालुके टँकरसह विहीर अधिग्रहणापासून मुक्त


जिल्ह्यात 11 तालुक्यांमध्ये 21 गावांसाठी 25 टँकरने सद्यस्थितीत पाणीपुरवठा केला जात असला तरी जळगाव, धरणगाव, यावल आणि रावेर या चार तालुक्यांमध्ये मात्र टँकर व अधिग्रहीतमुक्त असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

गतवर्षी होता 24 टक्के अथात 13 टिएमसी जलसाठा


जिल्ह्यात जानेवारीपासूनच उन्हाची दाहकता जाणवण्यास सुरूवात झाली होती. दरम्यान दोन ते तीन वेळा फेब्रुवारी महिन्यात तसेच मे महिन्यात बेमोसमीसह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे उन्हाची दाहकता काही अंशी कमी अधिक प्रमाणात जाणवून येत होती. दरम्यान, जिल्ह्यातील 3 मोठ्या प्रकल्पात 14.49 टिएमसी तर अन्य 14 मध्यम व 96 लघू अशा विविध प्रकल्पात सरासरी 18.79 टिएमसी अर्थात 34.60 टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

जिल्ह्यात गिरणा 21.44, हतनूर 55.69 तर वाघूर 66.23 असा सरासरी 40.78 टक्के मोठया प्रकल्पात तर लघू व मध्यम प्रकल्पात सरासरी 18.79 टिएमसी उपयुक्त जलसाठा आहे. यात बोरी, भोकरबारी, अग्नावती प्रकल्पात शून्य टक्के, हिवरा 4.03, तोंडापूर 9.60, मन्याड 10.59, बहुळा 21.76, शेळगाव बॅरेज 22.66, अंजनी 25.71, मंगरूळ 38.68, गुळ 43.84, अभोरा 58.54, मोर 62.63, सुकी 71.30 असा एकूण 18.79 टिएमसी अर्थात 34.60 टक्के उपयुक्त जलसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी सरासरी 13.08 टिएमसी अर्थात 24.10 टक्के उपयुक्त जलसाठा असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे होती.

मोठया प्रकल्प पाणलोट क्षेत्रात प्रथमच आवक


दरम्यान, जिल्ह्यात मान्सूनचे नेहमीप्रमाणे एक आठवडा उशीरा का होईना पण दमदार आगमन झाले आहे. हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात सरासरी 2 मिलीमीटर पाऊस झाला असून 1.50 दलघमी अर्थात 0.05 टिएमसी पाण्याची आवक झाली आहे. गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात 11 मि.मी.पाऊस झाला असून 0.17 दलघमी पाण्याची आवक झाली आहे. सुकी मध्यम प्रकल्प पाणलोट क्षेत्रात 5, अग्नावती 3, हिवरा 9, बहुळा 15, तोंडापूर 10, गुळ 13, मन्याड 14, बोरी 40, तर भोकरबारी 16 असे एकूण सरासरी 72 मिलीमीटर पाऊस तर सरासरी 1.67 टिएमसी पाण्याची आवक नोंद झाली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---