पुण्यात ‘या’ तारखेला पाणी पुरवठा बंद; कोणत्या भागात येणार नाही पाणी ?

पुणे : नवीन आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, भामा आसखेड, वारजे, एसएनडीटी आणि अन्य ठिकाणी स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवार, 12 तारखेला शहराच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी, 13 तारखेला सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.

‘या’ भागात होणार पाणीपुरवठा बंद
पर्वती एमएलआर टाकी परिसर : सोमवार पेठ,  बुधवार पेठ, गुरुवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर,  अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर

पर्वती एचएलआर टाकी परिसर :  सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, ढोले मळा, सॅलिसबरी पार्क, आंबेडकरनगर डायस प्लॉट,  गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, सर्वे क्रमांक ४२ कोंढवा खुर्द, साईबाबानगर, इत्यादी.

पर्वती एलएलआर टाकी परिसर : शहरातील सर्व पेठा, राजेंद्रनगर,  दत्तवाडी, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर.

एसएनडीटी एमएलआर टाकी परिसर : गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बँक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी,  वैदुवाडी, भोसले नगर, हनुमान नगर, केळेवाडी,गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडियल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रस्ता, जनवाडी, अशोकनगर, खैरेवाडी, शिवाजी हाऊसिंग सोसायटी, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, सेनापती बापट रस्ता, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलिस लाईन, संगमवाडी.

एसएनडीटी एचएलआर टाकी : गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ, लॉ कॉलेज रस्ता, महाबळेश्वर हॉटेल पर्यंत रस्ता, बीएमसीसी महाविद्यालय रस्ता, भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, पौड रस्ता, शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसायटी, भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर, सहवास, क्षिप्रा, मनोहर सोसायटी, विठ्ठल मंदिर परिसर करून, गोसावी वस्ती परिसर, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एचए कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनीता, युको बँक कॉलनी, टँकर पॉइंट डीपी रस्ता मंगेशकर रुग्णालय हिमाली सोसायटी,  करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बीग बाजार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डीपी रस्त्याचा काही भाग, मयूर कॉलनी परिसर, मयूर डीपी रस्त्याची डावी बाजू, कर्वे रस्ता, झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, दशभुजा गणपती ते नळस्टॉप,  वकिलनगर इत्यादी, करिष्मा सोसा. ते वारजे क्षेत्रीय कार्यालय, गिरिजा शंकर, नवसह्याद्री ताथवडे उद्यान परिसर, नीलकमल, युनायटेड वेस्टर्न, अनुरेखा स्थैर्य, मधूचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल, महिम्न, सुखा जयशक्ती.

वारजे जलकेंद्र चांदणी चौक टाकी परिसर : पाषाण साठवण टाकी, भूगाव रस्ता परिसर कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, भारतीनगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, सूरज नगर, सागर कॉलनी,  पूजा पार्क, शांतिबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रस्ता.

गांधी भवन टाकी परिसर : कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, किर्लोस्कर डिझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, अतुलनगर, बीएसयुपी योजना, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१ आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (काही भाग), शांतिवन गांधी स्मारक,  मृण्मयी प्रीमारोज आर्चिड गल्ली क्रमांक ७ व ९, मुंबई पुणे महामार्गाच्‍या दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीश सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियमस्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रस्ता.

पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर : बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती,  विजयनगर, मेडिपॉईंट रस्ता, आंबेडकरनगर, दत्त नगर.

वारजे जलकेंद्रालगत जीएसआर टाकी परिसर : तपोधाम सोसायटी, कर्वेनगर गावठाण परिसर,  शाहू गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १० कॉलनी

चतु:श्रृंगी टाकी परिसर :  औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखल वाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, औंधगाव परिसर,  नॅशनल, सिंध सोसायटी.

पाषाण पंपिंग व सुस गोल टाकी परिसर : पॅनकार्ड रोड, गणराज चौक,  वीरभद्र नगरचा काही भाग, समर्थ कॉलनी काही भाग इत्यादी.

जुने वारजे जलकेंद्र भागः  रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळनगर पठार, विठ्ठल नगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदीप चौक, अमर भारत सोसायटी, गणपती माथा परिसर, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, एनडीए रोडचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी इत्यादी.

लष्कर ते खराडी पंपिंग क्लोजरमुळे पाणीपुरवठा बंद होणारा परिसर : खराडी गावठाण, आपले पार, तुळजाभवानी नगर, इऑन परिसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, थिटे वस्ती, यशवंतनगर, चंदननगर, सुनितानगर, तुकाराम नगर,  धर्मनगर, सोमनाथनगर, गार्डेनिया, धनलक्ष्मी सोसायटी, गणेशनगर, आनंदपार्क, राजश्री कॉलनी, मतेनगर, महावीरनगर, माळवाडी, मुन्नुरवार सोसायटी इत्यादी.

लष्कर जलकेंद्र भाग :  संपूर्ण रामटेकडी इंडस्ट्रिअल एरिया, सय्यदनगर, हेवनपार्क, गोसावी वस्ती शंकर मठ, वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, बी.टी. कवडे रस्ता, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर मांजरी बुद्रूक, शेवाळेवाडी,  कोरेगाव पार्क, ओरिएंट गार्डन, साडेसतरानळी, महंमदवाडी रस्ता उजवीकडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रस्ता, फुरसुंगी उरुळी देवाची भेकराईनगर (टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद), हाय सर्व्हिस, बेकर हिल, रेसकोर्स, ठाकरसी टाकी, कॅम्प, ससून.

नवीन व जुने होळकर जलकेंद्र : मुळा रस्ता, एमएफएस, संपूर्ण खडकी कॅन्टॉनमेंट बोर्ड,  हरीगंगा सोसायटी इत्यादी.

वडगाव जलकेंद्र परिसर : दत्तनगर, टेल्को कॉलनी परिसर, संतोषनगर मुख्य रस्ता महावीकुंज, रेलीकॉन, दत्तनगर-आंबेगाव रस्ता, दत्तनगर चौक, संतोषनगर व अंजलीनगर परिसर, आगम मंदिर परिसर, गुरुद्वारा इत्यादी परिसर, कात्रजगाव, गुजरवाडी फाटा, लिंबाळकर वस्ती, उत्कर्ष, राजस, इंद्रप्रस्थ, भूषण सोसायटी परिसर, सुखसागर नगर भाग-१ व भाग-२, कात्रज कोंढवा रस्ता, शिवशंभोनगर, गोकुळनगर, श्रीकृष्ण मंदिर परिसर, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकरनगर, येवलेवाडी, कोंढवा गाव, लक्ष्मीनगर परिसर, काकडे वस्ती, अशरफनगर, ग्रीनपार्क, साईनगर, गजानननगर, राजीव गांधी नगर, खडीमशीन परिसर, बालाजीनगर, श्रीहरी सोसायटी, गुरूदत्त सोसायटी, पुण्याई नगर, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी,  कोंढवा बुद्रूक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रूक, भारती विद्यापीठ परिसर, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकर नगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी .

भामा आसखेडः  लोहगाव, वडगाव शेरी, विमाननगर,  विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, धानोरी इत्यादी.