गिरणातून विसर्ग सोडणार, नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा

---Advertisement---

 

Jalgaon News : जिल्ह्यात तसेच नाशिक जिल्ह्यात गिरणा नदी व पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. यामुळे गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून प्रकल्प लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गिरणा प्रकल्पातून लवकरच विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यानुषंगाने नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

नाशिक आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गिरणा प्रकल्पाच्यावर नाशिक जिल्ह्यात चणकापूर, अर्जूनसागर, ठेंगोडा बंधारा, हरणबारी, नागासाक्या, केळझर आणि माणिकपुंज अशा सात प्रकल्पापैकी पाच मध्यम प्रकल्प पूर्ण भरले आहेत. या प्रकल्पातून होत असलेल्या 3843 क्यूसेक विसर्गामुळे प्रकल्पात 5.76 दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली असून जलपातळी 94 टक्क्यांवर पोचली आहे.

गिरणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  • गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पाण्याच्या आवकेमुळे गिरणा प्रकल्पात 2 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता 17 हजार 298 दशलक्ष घनफुट (93.55टक्के) पाणीसाठा निर्माण झालेला आहे. गिरणा प्रकल्पा पाणलोट क्षेत्रात पाण्याची होणारी आवक पाहता गिरणा प्रकल्पाचा पाणीसाठा कोणत्याही क्षणी 100 टक्के होण्याची शक्यता आहे. गिरणा प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने प्रकल्पातून पुराचे अतिरीक्त पाणी गिरणा नदीपात्रामध्ये सोडण्यात येईल. तरी गिरणा नदीकाठावरील सर्व गावातील नागरिकांना तसेच संबंधित यंत्रणांना सतर्कतेचा इशारा व पुर्वसुचना देण्यात येत आहे.
    विनोद पाटील – कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---