करिअर करण्याचा विचार आपण मुलांवर लादू नये : संघप्रमुख मोहन भागवत

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले की, पाश्चात्य सभ्यता व्यक्तिवादाला प्राधान्य देते तर भारतीय समाज कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवतो.महाराष्ट्राचे भाजप आमदार अमित साटम यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला संबोधित करताना संघप्रमुखांनी हे भाष्य केले.

ते म्हणाले की, करिअर करण्याचा विचार आपण मुलांवर लादू नये. संघप्रमुखांनी  विशिष्ट क्षेत्रात करिअर करण्यासाठी पालकांनी आपले विचार मुलांवर लादू नये. त्यांच्या मुलांनी संगीत किंवा स्वयंपाक यांसारखे छंद जोपासले तर ते तितकेच समाधानकारक ठरेल. आमदार अमित साटम लिखित उडान या पुस्तकाचे प्रकाशन संघप्रमुखांच्या हस्ते झाले.

पाश्चात्य संस्कृतीशी तुलना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, पालक, विशेषत: उच्च शिक्षित पार्श्वभूमीचे, त्यांच्या मुलांवर उच्च शिक्षण घेण्यासाठी दबाव आणतात. ते म्हणाले की, पाश्चात्य संस्कृतींमध्ये व्यक्ती ही मूलभूत एकक मानली जाते. जिथे व्यक्तिवादावर जास्त भर असतो. याउलट आपला समाज कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवतो. एक सशक्त कौटुंबिक घटक सशक्त समाजाचा आधार बनू शकतो. आपल्या समाजाचा स्वभावच इतरांना मदत करण्याचा आहे. त्यांनी पालकांना आवाहन केले की,  त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने कमवायला शिकवावे आणि समाजाच्या भल्यासाठी त्यातील काही अंशी योगदान देण्यास प्रोत्साहित करावे.