संपन्न अमेरिकेचे तुकडेतुकडे होतील एलॉन मस्क हे राष्ट्राध्यक्ष होतील; कुणी वर्तविले ‘हे’ भविष्य? 

 अमेरिका : नॉस्ट्राडॅमॉस नावाचा दोनेकशे वर्षापूर्वी एक भविष्यवेत्ता होऊन गेला आयफेल टॉवर कोसळणार असे आणि अश्या प्रकारचे चकित करणारे भविष्य त्याने वर्तवले होते. भारताच्या बाबतीत म्हणाल तर विसाव्या शतकात भारताला एक खंबीर नेतृत्व मिळणार आहे. जे जगाला प्रिय होईल. हे नेतृत्व दक्षिण भारतातून उदयास येईल. असे भविष्य वर्तविले होते. मोदी हे सध्या भारताचे खंबीर नेतृत्व आहे. जे जगात प्रिय आहे परंतु, ते गुजरात मधील आहे दक्षिणेतील नाही.

आता असेच एक चमत्कारीक भविष्य वर्तवण्यात आले आहे मात्र, हे भविष्य सांगणारा कोणी ज्योतीषी नाही तर रशियाचे माजी पंतप्रधान आहेत. युक्रेन युद्धाच्या पाश्वर्भूमीवर त्यांनी एक ट्विट केले आहे. हे ट्विट वाचल्यानंतर आश्चर्य वाटते कारण त्यांनी अतिशय धक्कादायक विधाने केली आहे. ते म्हणतात येत्या काही वर्षात अमेरिकेत अंतर्गत यादवी होईल युद्ध भडकेल टेक्सास आणि कॅलिफोर्निया स्वतंत्र होईल. मेक्सिको टेक्सासशी हात मिळवणी करून नवीन राष्ट्र उदयाला येईल. एलॉन मस्क हे अमेरिकेचे अध्यक्ष होतील सध्या जगावर वर्चस्व गाजवणार डॉलर डळमळीत होईल.

जर्मनी पोलंड आधी बाल्टीक देश एक होतील आणि एक प्रबळ राष्ट्र तयार होईल. खनिज तेलाचा भडका उडेल दीडशे डॉलर पर बॅरल या दराने जगाला तेल खरेदी करावा लागेल. हे भविष्य हलक्यात घेऊन चालणार नाही. कारण हे माजी पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव रशियाचे हुकूमशहा पुतीन यांच्या खास मर्जीतील आहेत. पुतीन कडून सध्या युक्रेनचा निर्णायक पराभव होत नाही आणि त्यांचे साथीदार मात्र अमेरिकेचे तुकडेतुकडे पडण्याचे स्वप्न पाहत आहेत.