Weather Update : 29 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता

हवामान खाते : फेब्रुवारी महिना शेवटचा आठवडा सुरू असुन दुपारी तापमान वाढत आहे.तर सकाळी आणि संध्याकाळी थंडी आणि दुपारच्याला गर्मी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे विविध आजार ही बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एकीकडे आता या दिवसांमध्ये कोरडे वातावरण व शेतीच्या इतर कामगिरीकडे व रब्बीतील काही पिके असताना येत्या काही दिवसात राज्यासह देशातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे राज्यासह देशात अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात पुढील पाच दिवस म्हणजे 29 फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 29 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यातही 25 ते 27 फेब्रुवारीपर्यंत, तीन दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय पावसाबरोबर गारपीट होण्याचाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती या पाच जिल्ह्यात पावसाची शक्यता जास्त असेल असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे योग्य नियोजन करावे, असा इशारा विभागाने दिला आहे.