Weather Update : राज्यात आजपासून तीन दिवस मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी

---Advertisement---

 

Weather Update : बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यात अनेक भागात ढगाळ हवामान तसेच पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. नैर्ऋत्य मान्सून ५ ऑक्टोबरपूर्वी राज्यातून माघार घेण्याची शक्यता नसल्यासे महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने गुरुवारी एक्सवर निवेदन पोस्ट करत सांगितले. महाराष्ट्रात २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे.

कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने शुक्रवारी धुळे, नंदुरबार आणि जळगाव वगळता संपूर्ण राष्ट्रासाठी येलो अलर्ट दिला आहे तर शनिवारी ११ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २५ सप्टेंबरपासून विदर्भात मुसळधार पावसाच्या नोंदी आहेत तर २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

२७ सप्टेंबर रोजी मराठवाडा आणि २७ व २८ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी २१० मिमीपेक्षा जास्त मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामान अंदाजानुसार त्यांच्या शेतीच्या कामांचे नियोजन करण्याचा आणि कापणी केलेल्या पिकांचे पाऊस आणि वादळी वाऱ्यांपासून संरक्षण करण्याचा सल्ला दिला आहे, असे त्यात म्हटले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

नदी-ओढ्यांना पूर येण्याची शक्यता

दक्षिण मराठवाडा, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील घाट (पर्वतीय) प्रदेशातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नद्या व ओढ्यांना पूर येऊ शकतो, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळात आज पाऊस दक्षिण विदर्भ व मराठवाड्याच्या लगतच्या भागात २६ सप्टेंबरच्या दुपारपासून मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेडसह जिल्ह्यांमध्ये सरी पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भ व मराठवाड्याच्या उर्वरित भागात हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण राहू शकते, असे त्यात म्हटले आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---