Weight Loss : डायटिंग करूनही वजन कमी होत नाही ? करा ‘हे’ घरघुती उपाय

बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी डायटिंगची पद्धत अवलंबतात, परंतु स्वत: ला उपाशी ठेवणे हा वजन कमी करण्याचा योग्य मार्ग अजिबात नाही. पोटाची चरबी कमी करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे फळ आणि भाज्यांचा रस फळ आणि भाज्यांचा रस वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यांचा आहारात समावेश करून तुम्ही एका आठवड्यात वजन कमी करू शकता. जाणून घ्या यात कोणत्या भाज्यांचा रस उपयुक्त आहे.

दुधी भोपळा
दुधी भोपळ्यामध्ये जीवनसत्त्व ए, बी आणि सी सोबतच इतर अनेक आवश्यक मिनरल्सदेखील आढळतात. ज्यामुळे पचनक्रिया योग्य राहते, ज्यामुळे पोटाच्या समस्या दूर राहतात. याशिवाय दुधी भोपळ्याच्या रसामध्ये फायबर, प्रोटीन आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होते. हे पिल्याने बराच वेळ पोट भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

पालक
पालक ही अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेली अतिशय फायदेशीर भाजी आहे, ज्याचा रस पिल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. पालकमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि फायबर असतात. पालकाच्या रसातील कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते, त्यामुळे आपल्या आहारात त्याचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

काकडी
उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने पोट आणि शरीर दोन्ही थंड राहते. काकडीच्या रसात अनेक पोषक घटक असतात. याचा रस पिल्याने शरीर हायड्रेटेड राहते, पचनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि वजनही नियंत्रणात राहते. इतकंच नाही तर काकडीचा रस पिल्याने त्वचेवर चमकही येते.

गाजर
गाजर फायबर, जीवनसत्त्वे आणि इतर अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते. गाजरामध्ये पेक्टिन असते, जे एक विद्रव्य फायबर आहे. यामुळे शरीरातील रक्तातील साखर कमी होते आणि मधुमेहासारख्या समस्यांचा धोका कमी होतो. गाजराचा रस पिल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.