Champions Trophy 2025: पाकिस्तानच्या यजमानपदासाठी होणारी ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ आपले गतविजेतेपद राखण्यासाठी उत्सुक असून, घरच्या मैदानावर खेळण्याचा त्यांना मोठा फायदा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी संघाला विशेष संदेश दिला आहे. त्यांनी पाकिस्तान संघाला “फक्त चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे ध्येय ठेऊ नका, तर २३ फेब्रुवारीला दुबईत भारताला हरवण्याचा निर्धार करा”, असे रोखठोक आवाहन केले आहे.
पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न
पाकिस्तान संघ मोहम्मद रिझवान यांच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा समतोल साधण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी या संघाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या असून, त्यांनी सरळसोट शब्दांत भारताविरुद्ध विजय मिळवण्यावर भर दिला आहे.
हेही वाचा : ‘घटस्फोट घेऊ’, म्हणत न्यायालय गाठलं अन् पत्नी आणि मुलांसमोरच… घटनेनं खळबळ
शरीफ म्हणाले, भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांचा संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिल्याने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवली जात आहे. IND vs PAK त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना २३ फेब्रुवारीला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. “आपली टीम खूप चांगली आहे आणि संघाची अलिकडच्या काळात चांगली कामगिरी झाली आहे. पण खरे आव्हान केवळ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे नाही, तर दुबईतील सामन्यात आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी भारताला हरवणे आहे. अश्या प्रकारे पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न पंतप्रधान शरीफ यांनी केला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना – स्पर्धेतील सर्वात मोठी चुरस
क्रिकेट विश्वात भारत-पाकिस्तान सामना हा नेहमीच एक हाय व्होल्टेज मॅच ठरतो. दोन्ही संघांमधील राजकीय तणाव, ऐतिहासिक प्रतिस्पर्धिता आणि क्रिकेटमधील वर्चस्वाची लढाई यामुळे हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना २०२३ च्या वनडे विश्वचषकात झाला होता, जिथे भारताने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे पाकिस्तान संघ यावेळी त्या पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असेल.