धनंजय मुंडेंना झालेला ‘Bell’s palsy’ आजार नेमका आहे काय ?

Dhananjay Munde :  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांना बेल्स पाल्सी (Bell’s Palsy) या दुर्मिळ आजाराचे निदान झाले असून, सध्या त्यांच्यावर मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना उपचार दिले जात आहेत.

धनंजय मुंडे यांनी स्वतः पोस्ट करत या संदर्भातील माहिती दिली आहे.  “माझ्या दोन्ही डोळ्यांवर 15 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया पार पडली. साधारण 10 दिवस डोळ्यांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला मिळाला होता. मात्र त्याच दरम्यान ‘बेल्स पाल्सी’ या आजाराचे निदान झाले. त्यामुळे सध्या मला सलग दोन मिनिटंही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक आणि जनता दरबाराला हजर राहता आले नाही. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना माहिती दिली आहे. लवकरच या आजारावर मात करून जनसेवेसाठी पुन्हा कार्यरत होईन.”

हेही वाचा : रात्री अचानक आला आवाज अन् पत्नीचं फुटलं बिंग, पुढे काय झालं?

बेल्स पाल्सी म्हणजे काय?

बेल्स पाल्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होतो. मुख्यतः चेहऱ्याच्या एका बाजूला स्नायू कमकुवत होतात किंवा अंशतः पक्षाघात होतो. या स्थितीत व्यक्तीला बोलताना, खाताना किंवा डोळे उघडताना त्रास होतो.

बेल्स पाल्सीची मुख्य लक्षणे

चेहऱ्याच्या एका बाजूचा स्नायू कमकुवत होणे किंवा सुन्न होणे

डोळ्याची पापणी व्यवस्थित बंद न होणे

बोलताना अडथळा येणे किंवा शब्द स्पष्ट न उच्चारता येणे

तोंडाच्या एका बाजूला हसताना बदल जाणवणे

अचानक चेहऱ्यावर ताण जाणवणे किंवा वेदना होणे

कोणत्या लोकांना अधिक धोका असतो?

मधुमेह असलेल्या रुग्णांना अधिक धोका

व्हायरल संसर्गानंतर होण्याची शक्यता

इम्युनिटी कमी असलेल्या व्यक्तींना होण्याचा धोका

अचानक तणाव किंवा तणावजन्य परिस्थितीमुळेही वाढू शकतो

बेल्स पाल्सीवर उपचार आणि रिकव्हरी

योग्य वेळी निदान व औषधोपचार केल्यास २-३ महिन्यात हा आजार बरा होतो.

फिजिओथेरपी आणि चेहऱ्याच्या स्नायूंचे व्यायाम फायदेशीर ठरतात.

स्टेरॉइड औषधे आणि अँटीव्हायरल ट्रीटमेंट दिली जाते.

स्ट्रेस टाळणे आणि पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे असते.