नवीन फोन खरेदी करताना कोणत्या गोष्टींकडे देणार लक्ष?, जाणून घ्या सविस्तर

तरुण भारत लाइव्ह । २९ डिसेंबर २०२२। बाजारात नेहमीच वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन्स लाँच होतात. नवीन फोन खरेदी करताना कोणता फोन निवडावा याचा विचार आपण करत असतो .  नवीन फोन खरेदी करत असताना कोणत्या गोष्टीकडे  आपण लक्ष दिले पाहिजे जेणेकरून नंतर पच्चताप करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही . देशातील कंपन्यांसोबतच अनेक परदेशी ब्रँडने देखील भारतीय बाजारात मजबूत पकड बनवली आहे. दर आठवड्याला नवीन स्मार्टफोन बाजारात लाँच होतो.  फोन खरेदी करताना केवळ किंमतच नाही तर इतर अनेक गोष्टींचा विचार करणे गरजेचे असते.स्मार्टफोन्सचा वापर आपण दिवसभर करत असतो. चॅट, कॉलिंग, गेम्स पासून ते चित्रपट पाहण्यासाठी फोनचा वापर आता केला जातो. त्यामुळे आपल्या नवीन फोन घेताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे हे आपण पाहूयात…

डिस्प्ले :

सध्या बाजारात मोठ्या आकाराच्या फूलएचडी डिस्प्लेसह अनेक फोन्स लाँच होत आहे. सर्वसाधारणपणे ६ इंचापेक्षा अधिक मोठे फोन्स बाजारात येत आहे. जर तुम्ही व्हिडीओ स्ट्रिमिंग, व्हिडीओ अथवा फोटो एडिटिंग, गेमिंगसाठी फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मोठ्या स्क्रीनसोबत फुल एचडी+ अथवा क्वाडएचडी रिझॉल्यूशनसह येणारा स्मार्टफोन खरेदी करणे कधीही चांगले. तुम्ही जर मेसेज, कॉलिंग अशा गोष्टींसाठी फोन वापरत असाल तर फुल-एचडी डिस्प्लेसह येणारे फोन देखील घेऊ शकता.

कॅमेरा               

तुम्ही जर खास फोटोग्राफीसाठी फोन खरेदी करत असाल तर कॅमेरा सेंसर नक्की पाहा. फोन खरेदी करण्यापूर्वी कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहा. अनेक स्मार्टफोन्समध्ये ४८ मेगापिक्सल, १०८ मेगापिक्सल आणि २०० मेगापिक्सल कॅमेरा दिला जातो. मात्र, मेगापिक्सलसोबतच कॅमेऱ्याची क्वालिटी देखील पाहा.

बॅटरी 

नवीन फोन खरेदी करताना सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे  फोन खरेदी करताना अधिक क्षमतेची बॅटरी आहे की नाही हे आधी पाहावे. सध्या बाजारात 5000mAh, 6000mAh, 7000mAh बॅटरीसह येणारे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. आपण फोने चा वापर दिवसभर करत असतो . त्यामुळे सारखा फोन चार्जिंग ला लावावा लागतो . त्यामुळे या क्षमतेची बॅटरी घेतल्यामुळे तुम्हला तुमचा फोन सतत चार्जिंग करावा लागत नाही. याची बॅटरी दिर्धकाळ टिकून राहते .

प्रोसेस

कोणताही फोन व्यवस्थित चालण्यासाठी प्रोसेसर खूप महत्त्वाचा आहे. बाजारात असे पण फोने आहेत जे फक्त गेमिंग साठी बनवले आहेत . प्रोसेसरमुळे फोन स्मूथ चालण्यास मदत होते . प्रोसेसर हा फोनचा महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही कोणत्या उद्देशाने फोन खरेदी करत आहात त्याचा विचार करा, त्यानंतर  योग्य प्रोसेसरची निवड करा .

स्टोरेज 

नवीन फोन खरेदी करताना फोन ची स्टोरेज चेक करणं देखील खूप महत्वाचं आहे . आपण आपल्या फोने मध्ये काही महत्वाच्या फाइल्स ,  असंख्य फोटो, व्हीडिओ आणि फाइल्स स्टोर करत असतो . फोन ची स्टोरेज चांगली असली पाहिजे . अँप्स वापरताना सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही . त्यामुळॆ नवीन फोन खरेदी करताना फोन ची स्टोरेज चेक करणे आवश्यक आहे.