---Advertisement---

जळगाव जिल्ह्यात आज कसे राहणार हवामान ? जाणून घ्या आयएमडीचा अंदाज

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात मृगाच्या पावसाने बुधवारी रात्री ७:३० ते ८:३० वाजेच्या दरम्यान जोरदार सलामी दिली. अचानक सैराट झाल्यासारखे वारे वाहू लागले. त्या पाठोपाठ विजांचा कडकडाट सुरू झाला. ७ तारखेला मृग नक्षत्र लागले. या नक्षत्रात झालेला पहिलाच पाऊस धडकी भरवणारा आणि नुकसानकारही ठरला. जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळली. वीजतारा तुटल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता. अशात जिल्ह्यात आज गुरुवारी पुन्हा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.

---Advertisement---

जिल्हयात झालेल्या जोरदार पावसामुळे झोपडी व पत्रावजा घरातील नागरिक अर्धा-पाऊण तास अक्षरशः जीव मुठीत धरून बसले होते. अशात जिल्ह्यात आज गुरुवारी पुन्हा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.

जळगाव जिल्ह्यात ५ मे पासून भारतीय हवामान विभागाकडून (आयएमडी) १० वेळा अलर्ट जारी करण्यात आले आहेत. त्यात ९ वेळा ‘यलो अलर्ट’ तर एक वेळेस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आले. त्यापैकी ६ वेळा हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेले अंदाज खरे ठरले आहेत. तर ४ वेळा व्यक्त केलेले अंदाज फोल ठरले. जून महिन्यात ५ व ६ जूनदरम्यान अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, यादरम्यान पाऊसच झाला नाही.

हवामान विभागाने दिलेल्या पावसाचा इशारानुसार जिल्ह्यात गुरुवारी (१२ जून) रोजी पाऊस तर होणारच आहे. मात्र, त्यासोबतच ४० ते ५० किमी वेगाने येणाऱ्या वादळी वाऱ्यांचाही सामना आता करावा लागणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---