Bhanu Saptami 2024: पंचांगानुसार, सध्या मार्गशीर्ष महिना सुरु आहे. धार्मिकदृष्ट्या हा महिना खूप विशेष आहे. व्रत-वैकल्याचा महना म्हणून मार्गशीर्ष महिन्याची ओळख आहे. या महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला भानु सप्तमी व्रत केले जाते. ही तिथी सूर्यदेवाला समर्पित आहे. मान्यतेनुसार, जो व्यक्ती या दिवशी पूर्ण श्रद्धेने सूर्यदेवाची पूजा करतो, त्याच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. तसेच साधकाला सुदृढ आरोग्य प्राप्त होतं. चला जाणून घेऊया या व्रताची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व.
भानु सप्तमीची तिथी आणि मुहूर्त
पंचांगानुसार, यंदाची भानु सप्तमी रविवार ७ डिसेंबर रोजी आहे. त्यानुसार, मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी ७ डिसेंबर रोजी म्हणजेच आज रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी प्रारंभ होईल. तर ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजून ४४ मिनिटांना समाप्त होईल. उदया तिथीनुसार, भानु सप्तमीचे व्रत ८ डिसेंबर रोजी केले जाईल. या दिवशी पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून १ मिनिट ते ६ वाजून ३३ मिनिटांपर्यंत आहे.
भानु सप्तमीची पूजाविधी
१ . भानु सप्तमी व्रताच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तात उठावे.
२ . स्नानादीपासून निवृत्त होत केशरी रंगाचे स्वच्छ वस्त्र परिधान करा.
३ . त्यानंतर, पुजेती तयारी करा.
४ . सूर्योदयाच्या वेळी उगवत्या सूर्याची पूजा करा.
५ . पाण्यात रोळी, गुळ, लाल फुलं आणि गंगाजल घालून सूर्य देवाला अर्घ्य अर्पण करा.
६ . अर्घ्य देत असताना सूर्य मंत्रांचा जप करा.
७ . दरम्यान, व्रताचा संकल्प करत दिवसभर व्रत पाळा.
८ . पुजेच्या वेळी तुपाचा दिवा प्रज्वलित करून सूर्य देवतेची आरती करा.
सूर्यदेव आरती
जय जय जगत्महरणा दिनकर सुखकिरणा ।
उदयाचल जगभासक दिनमणि शुभस्मरणा ॥
पद्मासन सुखमुर्ती सुहास्यवरवदना ।
पद्मकरा वरदप्रभ भास्वत सुखसदना ॥ 1 ॥
जय देव जय देव जय भास्कर सूर्या।
विधिहरिशंकररूपा जय सुरवरवर्या ॥ ध्रु० ॥
कनकाकृतिरथ एकचक्रांकित तरणी ।
सप्ताननाश्वभूषित रथिं ता बैसोनी ॥
योजनसहस्त्र द्वे द्वे शतयोजन दोनीं।
निमिषार्धे जग क्रमिसी अद्भुत तव करणी ॥ जय० ॥2॥
जगदुद्भवस्थितिप्रलय-करणाद्यरूपा ।
ब्रह्म परात्पर पूर्ण तूम अद्वय तद्रूपा ॥
तत्त्वंपदव्यतिरिक्ता अखंड सुखरूपा।
अनन्य तव पद मौनी बंदित चिया ॥ जय० ॥3॥