Diwali 2024: हिंदू धर्मात दिवाळी सणाचं विशेष महत्त्व आहे. संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दरवर्षी दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला साजरा केला जातो. यावेळी दिवाळीच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. काही लोक 31ऑक्टोबरला दिवाळी साजरी होईल असे सांगत आहेत तर काही लोक 1नोव्हेंबरला दिवाळी साजरी करणार असल्याचे सांगत आहेत.
कधी आहे दिवाळी ?
आश्विनी महिन्यातील अमावस्या तिथीला दिवाळीचा सण साजरा करण्यात येतो. पंचांगानुसार अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजून 12 मिनिटापासून 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजून 53 मिनिटापर्यंत असणार आहे.
ज्योतिषीनुसार, उदय तिथी 1 नोव्हेंबरला येत आहे, त्यामुळे या दिवशी लक्ष्मी पूजन केलेलं लाभदायी ठरेल. कारण भारतीय शास्त्रात उदय तिथीला महत्त्व आहे. त्यासोबत प्रदोष काळ आणि वृषभ काळ हे दोन शुभ काळ दिवाळीत पूजेसाठी महत्वाचे आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार प्रदोष आणि वृषभ काळात दिवाळी पूजा किंवा लक्ष्मी पूजा करणे खूप शुभ मानले जाते.
1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 35 मिनिटांपर्यंत लक्ष्मी पूजनाचं मुहूर्त असल्याचं सांगण्यात आला आहे. या प्रदोष काळात श्री लक्ष्मीपूजन व वहीपूजन करावे.
दोन दिवस प्रदोषकाळी आश्विन अमावास्या कमी-अधिक प्रमाणात असली तरी लक्ष्मी-कुबेरपूजन दुसऱ्या दिवशी प्रदोषकालात करावे असे धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथिनिर्णय, व्रतपर्व विवेक इत्यादी अनेक धर्मशास्त्रीय ग्रंथात दिलं आहे.
दिवाळीचे पाच दिवस
धनत्रयोदशी – 28 ऑक्टोबर
नरक चतुर्दशी – 31 ऑक्टोबर
लक्ष्मी पूजन- 1 ऑक्टोबर
दिवाळी पाडवा – 2 ऑक्टोबर
भाऊबीज – 3 ऑक्टोबर