Video: सुपरस्टार राजनीकांत यांचे तुम्हीही कराल कौतुक

नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत यांनी योगींची नुकतीच भेट घेतली आणि  त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. सध्या परिस्थिती भारताची संस्कृती लुप्त होत असल्याचे दिसत आहे. विशेष करून तरुणांनामध्ये.अश्यातच  सुपरस्टार रजनीकांत यांनी संस्कृतीची जाणीव करून दिली आहे.

अभिनेता शुक्रवारी रात्री त्याच्या ‘जेलर’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी लखनऊला पोहोचले. याच दरम्यान  अभिनेते रजनीकांत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊ येथील निवासस्थानी भेट घेतली.रजनीकांत आणि योगी आदित्यनाथ यांच्या भेटीत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यही उपस्थित होते.

या अभिनेत्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. रजनीकांत यांनी त्यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद आणि यशाबद्दल उत्साह व्यक्त केला.उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी रजनीकांतच्या अभिनय कौशल्याचे कौतुक केले आणि म्हणाले, मलाही ‘जेलर’ चित्रपट पाहण्याची संधी मिळाली.

मी रजनीकांतचे अनेक चित्रपट पाहिले आहेत आणि तो इतका प्रतिभावान आहे की चित्रपटात फारसा आशय नसला तरी तो आपल्या अभिनयाने चित्रपटाचे महत्त्व वाढवतो. यापूर्वी रजनीकांत झारखंडमधील रांची येथे होते. शुक्रवारी त्यांनी राज्यातील प्रसिद्ध चिन्नमस्ता मंदिरात जाऊन पूजाअर्चा केली.

रांची येथील ‘यघोडा आश्रमात’ त्यांनी तासभर ध्यानधारणा केली. यानंतर त्यांनी झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची राजभवनात भेट घेतली. 10 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.