तरुण भारत लाईव्ह । जळगाव : आज देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. याचे कारण म्हणजे चांद्रयान 3 या मोहिमेचा आज महत्वाचा टप्पा आहे. आज म्हणजेच २३ ऑगस्ट ला संध्याकाळी ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आधीच सांगितले आहे की चांद्रयानचे विक्रम लँडर चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे जिथे चंद्राचा सर्वात जवळचा बिंदू फक्त 25 किलोमीटर आहे, आता तो हळूहळू पृष्ठभागाकडे जात आहे. सर्व काही ठीक राहिल्यास, विक्रम लँडर संध्याकाळी 6.04 वाजता चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. भारतासह जगभरातील लोकांच्या नजरा चांद्रयान-3 वर खिळल्या आहेत.
https://www.facebook.com/TarunBharatLive/live_videos/
ISRO ने चांद्रयान-3 च्या लँडिंगची तारीख, वेळ आणि त्याचा लाइव्ह व्हिडीओ, कुठे आणि कसा पाहायचा याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे जर तुम्हालाही चांद्रयान-3 चे लँडिंग पाहायचे असेल तर 23 ऑगस्टच्या संध्याकाळसाठी तयार रहा. लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर सॉफ्ट लँडिंग करेल, असे इस्रोने आधीच सांगितले होते. Chandrayaan-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर, विक्रम लँडर पृथ्वीच्या वातावरणाचा तसेच चंद्रावर असलेल्या खनिजांचा अभ्यास करण्यासाठी चंद्रावर फिरत राहील.
चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 यशस्वीपणे उतरताना लोक कसे पाहू शकतात याची माहिती इस्रोने ट्विट करून दिली आहे. इस्रोच्या म्हणण्यानुसार, चांद्रयान-3 च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण इस्रोच्या प्रत्येक अधिकृत साइटवर केले जाईल. यामध्ये ISRO ची वेबसाईट, ISRO ची YouTube, ISRO ची Facebook आणि Twitter पेजेसचा समावेश आहे. याशिवाय TarunBharatLive यावरही थेट प्रक्षेपण पाहण्यास सक्षम असाल.