India Biggest Railway Station : भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करीत असतात. तुम्हीदेखील कधी ना कधी रेल्वेने प्रवास केला असेल. या प्रवासादरम्यान, तुम्हाला अनेक ठिकाणी लहान-मोठे स्टेशन दिसून आले असेल. पण भारतात सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कुठे आहे? असा प्रश्न कधी पडलाय का? तर मग आज आपण या रेल्वे स्टेशनबद्दल जाणून घेऊया…
भारतात रेल्वेचे मोठे जाळे असून, रेल्वेला भारताची जीवन-वाहिनी म्हटले जाते. सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत प्रेत्येक वर्गातील नागरिक रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे रेल्वे प्रवास न केलेला व्यक्ती शोधणे कठीण आहे. अश्या या रेल्वेबद्दल अनेक रंजक गोष्टी आहे, त्यातलं एक म्हणजे भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन. हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे, जिथं तब्बल २३ गाड्या एकावेळेला थांबतात. तर २४ तासात या रेल्वे स्टेशनवर ६०० पेक्षा अधिक गाड्या थांबतात. हे रेल्वे स्टेशन आहे हावडा रेल्वे स्टेशन.
हेही वाचा : रात्री अचानक आला आवाज अन् पत्नीचं फुटलं बिंग, पुढे काय झालं?
पश्चिम बंगालमधील हावडा रेल्वे स्टेशन हे भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. 1854 साली ईस्ट इंडिया कंपनीने हुगळी नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर हे स्टेशन बांधले, आणि तेव्हापासून ते भारतीय रेल्वेच्या मुख्य केंद्रांपैकी एक बनले आहे.
हावडा रेल्वे स्टेशन हे देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानक मानले जाते. दररोज येथे 10 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात, तसेच 600 हून अधिक गाड्या येथे थांबतात. येथे 26 रेल्वे ट्रॅक असून, एकावेळी 23 ट्रेन या स्थानकावर उभ्या राहू शकतात.
हावडा स्टेशनवरून देशाच्या सर्व भागांत रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. उत्तर भारत, दक्षिण भारत, पश्चिम भारत आणि ईशान्य भारताच्या सर्व प्रमुख शहरांपर्यंत येथे रेल्वे सेवा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, परदेशात जाण्यासाठीही येथे गाड्या उपलब्ध आहेत, यामध्ये बांगलादेशातील ढाका येथे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचा समावेश होतो.
हेही वाचा : धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; एक गर्भवती, दुसरीची प्रसूती
सामान्यत: भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक दिल्ली किंवा मुंबईमध्ये असावे, असे वाटते. मात्र, हावडा रेल्वे स्टेशनने हे स्थान पटकावले आहे. त्याच्या विस्तीर्ण पायाभूत सुविधांमुळे आणि दररोजच्या प्रवाशांच्या संख्येमुळे, ते भारतातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे.
हावडा स्टेशन : ऐतिहासिक आणि आधुनिकतेचा मिलाफ
इतिहास आणि आधुनिकतेचा मिलाफ असलेले हावडा रेल्वे स्टेशन हे केवळ एक स्थानक नसून, भारतीय रेल्वेच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. 1854 पासून ते आजपर्यंत प्रवाशांसाठी सेवा देत आहे आणि भविष्यातही आधुनिक तंत्रज्ञानाने याचा विस्तार होण्याची शक्यता आहे.