Post Office Investment: पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना आहेत ज्यावर बँकेहूनही चांगले व्याज दर मिळत असतात. दरम्यान, बँकांप्रमाणे तुम्हीही पोस्ट ऑफिसमध्ये एफडी (FD), आरडी (RD) आणि पीपीएफ (PPF) सारख्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.
सरकार दर तीन महिन्यांनी पोस्ट ऑफिस योजनांवर उपलब्ध व्याजात सुधारणा करते. तुम्हीही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्या आधी जाणून घ्या की कोणत्या स्कीमवर किती फायदा होतो.
पोस्ट ऑफिस योजनांचे व्याजदर
पोस्ट ऑफिस बचत खाते- 4%
1 वर्षाची मुदत ठेव- 6.9%
2 वर्षाची मुदत ठेव- 7.0%
३ वर्षाची मुदत ठेव- 7.1%
5 वर्षांची मुदत ठेव- 7.5%
5-वर्ष आवर्ती ठेव खाते- 6.7%
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे- 7.7%
मासिक उत्पन्न योजना- 7.4%
किसान विकास पत्र- 7.5%
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र- 7.5%
ज्येष्ठ नागरिक बचत योजना- 8.2%
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना- 7.1%
सुकन्या समृद्धी खाते- 8.2%