केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अतिशय महत्त्वाचे वक्तव्य करत काश्मीरमधूनच नाहीतर देशातून दहशतवादाचा नाश करणार असल्याचे वक्तव्य केले होते. जम्मू आणि काश्मीर अँड लदाख थ्रू द एजेस या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी शाह यांनी हजेरी लावत महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. मैथुनी सृष्टी ही सप्तऋषींपासून पुढे सुरू झाली. तेव्हापासून हिंदू संस्कृतींत कुटुंब पद्धत सुरू झाली. सप्तऋषींपैकी एक कश्यप ऋषी यांनी आसेतू हिमाचल भारत वर्षाला जोडणाऱ्या सिंधू नदीच्या तीरावर तप केले व अनेक संस्कृतींना पद्धतींना सर्व समावेशी भावनेतून सनातन हिंदू धर्मियांशी जोडले. हिंदू संस्कृतीत सर्व धार्मिक अनुष्ठानात कुळाचार करावाच लागतो.
देशातील प्रत्येक कोपऱ्याचा इतिहास हजारो वर्षे जुना असताना तो आक्रमणाच्या व गुलामीच्या कालखंडात जाणीवपूर्वक मिटवण्यात आला. ह्या सर्व घटनेमुळे हिंदू समाजातील अनेकांना गोत्रपद्धती, कुळाचार व अनेक धर्माच्या गोष्टींपासून लांब करण्यात आले. मात्र, कालांतराने अनेक पौराणिक साहित्य जपलेल्या अभ्यासकांनी व ऋषी मुनींनी कश्यप ऋषींपासून निर्माण झालेल्या सर्व समावेशी संस्कृतीला आपण स्वीकारले पाहिजे अशी मान्यता दिली आणि त्याचा स्वीकार कालांतराने लोक करत आहेत. त्यामुळे आजही सर्व समाजात धार्मिक अनुष्ठान करताना ज्यांना गोत्र पद्धतीबद्दल माहिती नसणाऱ्यांना कश्यप गोत्र स्विकारण्याची मान्यता देण्यात आली आहे.
भारतात पूर्वी विज्ञान तंत्रज्ञान प्रगत नव्हते त्यामुळे अनेकांनी आपल्या जन्मतारखांची नोंद ठेवता आल्या नाहीत. अशा वेळी शाळेत शिक्षणासाठी प्रवेशादरम्यान शौक्षणिक दाखल्यावर १ जून ही तारीख सरकारच्यावतीने सार्वजनिकरित्या घोषित करण्यात आली. सर्वांनी त्या तारखेचा स्वीकार केला तसेच सनातन हिंदू संस्कृतीत कुटुंब पद्धतीला पुढाकार देण्यास अनेक सर्वसमावेशी संस्कृती ज्यांनी तयार केली अशा मूळपुरुष असलेल्या ऋषी कश्यप यांना सर्वांनी आपले गोत्र स्वीकारले आहे.
जेव्हा इतिहास म्हणजे दिल्ली दरिबा ते बल्ली मारन आणि लुटियन्स ते जिमखाना. इतिहास एवढाच मर्यादित होता. राज्यकर्त्यांना खूश करण्यासाठी इतिहासात लिहिलेल्या काही बाबींपासून आता मुक्त होण्याची वेळ आली आहे. मी इतिहासकारांना आवाहन करतो की त्यांनी आपला हजारो वर्षांचा इतिहास तथ्यांसह लिहावा. पुढे शाह म्हणाले की, काश्मीरचे भारताशी अतूट नाते आहे. लडाखमध्ये मंदिरे पाडली गेली, काश्मीरमध्ये स्वातंत्र्यानंतर चुका झाल्या असून नंतर त्या सुधारल्या. शंकराचार्य, सिल्क रूट, हेमिश मठ यांच्या उल्लेखावरून भारतीय संस्कृतीचा पाया काश्मीरमध्येच घातला गेला हे सिद्ध झाले. काश्मीरमध्ये सुफी, बौद्ध आणि शैल मठांची भरभराट झाली. देशातील जनतेसमोर योग्य गोष्टी ठेवल्या पाहिजेत.
देशाला जोडणारी वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे – अमित शाह
भारताला समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या देशाला जोडणारे तथ्य समजून घेतले पाहिजे. काश्मीर आणि लडाख कुठे होते, त्यावर कोणी राज्य केले, तेथे कोण वास्तव्य केले आणि कोणते करार झाले याचे विश्लेषण करणे व्यर्थ आहे. इतिहासाकडे विकृत दृष्टिकोन असलेले इतिहासकारच हे करू शकतात. भारताची १०हजार वर्षे जुनी संस्कृतीही काश्मीरमध्ये होती.८ हजार वर्षे जुन्या पुस्तकांमध्ये काश्मीर आणि झेलमचा उल्लेख असताना ते काश्मीर कोणाचे आहे यावर कोणीही भाष्य करू शकत नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच आहे. कायद्याच्या कलमांचा वापर करून कोणीही ते बाजूला ठेवू शकत नाही. वेगळे करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु कालांतराने ते प्रवाह रद्द झाले आणि सर्व अडथळे दूर झाले.पुस्तकात ८ हजार वर्षांचा संपूर्ण इतिहास शहा म्हणाले- ‘जम्मू आणि काश्मीर आणि लडाख थ्रू द एज’ या पुस्तकात सर्व तथ्ये तपशीलावर मांडण्यात आली आहेत. जुन्या मंदिरांच्या अवशेषांमध्ये असलेली कलाकृती काश्मीर भारताचा एक भाग असल्याचे सिद्ध करते. नेपाळ ते अफगाणिस्तान या बौद्ध प्रवासाचा काश्मीर देखील अविभाज्य भाग आहे. बौद्ध धर्मापासून ते जमीनदोस्त झालेल्या मंदिरांपर्यंत, संस्कृतच्या वापरापर्यंत, महाराजा रणजित सिंग यांच्या राजवटींपासून ते डोगरा राजवटीपर्यंत, १९४७ सालानंतर झालेल्या चुका आणि त्या सुधारण्यापर्यंतचा ८ हजार वर्षांचा संपूर्ण इतिहास या पुस्तकात नमूद करण्यात आला आहे.
सागर देवरे