IPL Mega Auction 2025: सव्वीस कोटींची बोली लागलेला श्रेयस अय्यर कोण? जाणून घ्या कारकीर्द

IPL Auction 2025 : आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी 24 आणि 25 नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या लिलिवात 577खेळाडूंचा समावेश आहे. मात्र यातील जास्तीत जास्त204खेळाडूंवरच बोली लागणार आहे. कारण सर्व संघांमध्ये मिळून 204 खेळाडूंतीच जागा शिल्लक आहे.

भारतीय संघाबाहेर असलेल्या श्रेयस अय्यरने मुंबईतील शरद पवार क्रिकेट अकादमीमध्ये रणजी करंडक एलिट गट अ सामन्यात ओडिशाविरुद्ध मुंबईसाठी शानदार द्विशतक झळकावून आपली उपस्थिती दर्शवली. हे द्विशतक म्हणजे श्रेयस अय्यरला आयपीएलच्या मेगा ॲक्शनमध्ये चर्चेत राहण्याचा विषय ठरले आहे.

श्रेयस अय्यरने अवघ्या 228 चेंडूत 233 धावा करून आपला पराक्रम दाखवला. खांद्याच्या दुखापतीतून विश्रांतीसाठी एका सामन्याच्या विश्रांतीनंतर, अय्यरचा नवीनतम खेळ सौदी अरेबियातील जेद्दाह येथे सुरु असलेल्या आयपीएल मेगा लिलावाच्या अगदी आधी महत्त्वपूर्ण वेळी आली आहे.

श्रेयस अय्यरची IPL मधील कारकिर्दी

श्रेयस अय्यर यापूर्वी 2015 ते 21 या कालावधीत दिल्लीकडून खेळला आहे, आणि या संघाचे नेतृत्वही केले आहे, 2020 मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने अंतिम फेरी गाठली होती.

श्रेयस अय्यरला केकेआरने आयपीएल 2022 मध्ये 12.5 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. त्याने 14 सामन्यांमध्ये 351 धावा केल्या. याच दुखापतीमुळे तो 2023 च्या संपूर्ण हंगामात खेळू शकला नाही. श्रेयस अय्यरने त्याच्या 115 सामन्यांच्या आयपीएल कारकिर्दीत 3127 धावा केल्या. त्याने आपल्या कारकिर्दीत 32.5 च्या सरासरीने धावा केल्या आणि या कालावधीत 21 अर्धशतकेही झळकावली होती.

श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये मागील पर्वात कोलकाता नाइट रायडर्सला जेतेपद जिंकून दिले होते. त्याने आयपीएलमध्ये 116 सामन्यांत3127धावा केल्या आहेत. पंजाबने आज110कोटी शिल्लक रक्कमेतील सर्वात जास्त रक्कम श्रेयससाठी खर्च करण्याचा निर्धार केला होता.

पंजाब आणि दिल्ली या दोन्ही संघांना भारतीय कर्णधार हवा होता आणि श्रेयस हा दमदार पर्याय आहे. पण, दिल्लीच्या खात्यात 73 कोटीच रक्कम होती, तर पंजाबकडे110 कोटी शिल्लक होते. त्यामुळे पंजाबने रिक्स घेतली. 26.25 कोटीपर्यंत बोली लागल्यावर दिल्लीने काही काळ वेळ घतेला. पण, पंजाबने 26.75 कोटींत श्रेयसला आपल्या ताफ्यात घेतले.