मणियार बंधूंचा आका कोण? छत्रपती शिवाजी ब्रिगेडचा पत्रपरिषदेत सवाल

---Advertisement---

 

जळगाव : पोलीस दलाच्या सभागृहात पिस्तुल बाळगत पैसे उधळणाऱ्या मणियार बंधूंचा आका कोण? असा सवाल छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अशोक शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रविवारी (२ नोव्हेबर) पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी डॉ. धनंजय बेंद्रे, संजय आवटे, यश पांडे, हरिभाऊ पाटील, सुधीर भैय्या पाटील, डॉ. गणेश पाटील, अमित पाटील, महेश पाटील उपस्थित होते.

याप्रकरणी चौकशीची मागणी सीबीआयकडे करणार असल्याचे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी ब्रिगेडने यासंदर्भात निवेदनात म्हटले, काही दिवसांपासून शहरात व्हाईट कॉलर असलेल्या पिस्तूल घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यांना सामाजिक प्रतिष्ठा देण्याचे काम कोणते लाभार्थी अधिकारी करीत आहेत? यामध्ये मणियार बंधू हे नाव मोठ्या आघाडीवर आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी कुठलीही कायदेशीर पूर्तता न पाहता अवैध मार्गाने पिस्तुलचे शस्त्र परवाने एकाच दिवशी दिल्याचे अघटीत जिल्ह्यात घडले. पदाचा गैरवापर करत जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी किती नितीभ्रष्ट असतो हे जळगाव जिल्ह्यातील तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सिध्द केले, असा घणाघात शिवाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांनी केला.

शस्त्र परवाना देताना संबंधिताना शस्त्र परवान्यांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. यात सक्षम असला तरच त्यांना संबंधित संस्था शस्त्र चालविण्यासाठी सक्षम असल्याचा दाखला देते. या दाखल्याशिवाय कुठेही शस्त्र परवाना दिला जात नाही. या मणियार बंधूंना राज्यात कोणत्या संस्थेने शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिलं. आणि शस्त्र चालवण्यासाठी सक्षम असल्याचा दाखला दिला आहे, हे तपासणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने व पोलीस विभागाने या मणियार यांना दोन वेळा शस्त्र परवाना नाकारल्यानंतर हे प्रकरण विभागीय आयुक्त यांच्याकडे जाणे नियमानुसार क्रमप्राप्त असताना बिन बोभाट शस्त्र परवाने दिले आहेत.

यात किती गैरव्यवहार झाला याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी आग्रही मागणी शिवाजी ब्रिगेडने केली. पोलीस दलाच्या मालकीच्या सभागृहात कमरेला पिस्तूल लावून पैसे उधळले जातात तेव्हा कोणत्या राजकीय सत्ताधिकाऱ्यांच्या दबावाखाली कारवाई केली गेली नाही? असा सवालही छत्रपती शिवाजी ब्रिगेडने उपस्थित केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---