Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख यांची व्हिडिओ कॉलवर मारहाण पाहणारा तो व्यक्ती कोण ? सीआयडीच्या तपासात माहिती आली समोर

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख  यांची हत्येच्या तपासासाठी 1 जानेवारीला नेमलेली एसआयटी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी सात जणांची एसआयटी स्थापन करण्यात आलीय. दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : 36 वर्षीय महिलेचं 15 वर्षीय मुलावर जडलं प्रेम; लग्नासाठी पळालेही, पण…

हेही वाचा : मुस्लिम तांत्रिक, अल्पवयीन मुलीला अर्ध्या रात्री बोलावलं अन्; गावात खळबळ 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक नेत्यांनी देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ कॉल एका व्यक्तीला आल्याचा आरोप केला होता. त्यामुळे व्हिडिओ कॉलवर मारहाण पाहणारा तो व्यक्ती कोण, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र सीआयडीच्या तपासात हा कॉल एका व्यक्तीला नव्हे, तर ‘मोक्कार पंती’ नावाच्या ग्रुपवर आल्याचे समोर आले आहे.

९ डिसेंबर रोजी झालेल्या या हत्येला ६ डिसेंबर रोजी झालेल्या वादाची किनार आहे. अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकासोबत सुदर्शन घुले, प्रतीक घुले व इतरांचा वाद झाला होता. या वेळी सरपंच देशमुख यांनी मध्यस्थी करतानाच घुले गँगला चोप दिला.

 

त्याचा व्हिडिओही सोशल मीडियातून व्हायरल केला गेला होता. दरम्यान, ६ डिसेंबर हा प्रतीक घुले याचा वाढदिवस असतो. आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच मार खावा लागल्याचा राग प्रतीक घुलेच्या मनात होता. यातूनच प्रतीक, सुदर्शन घुले व त्याच्या सहकाऱ्यांनी संतोष देशमुख यांच्या अपहरणाचा प्लॅन केला होता.

९ डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करण्यात आले. या वेळी जीपमध्येच देशमुख यांना काठी, फायटरने मारहाण केली गेली. ही मारहाण करत असतानाच ‘मोक्कार पंती’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपला व्हिडिओ कॉल केला गेला होता.

संतोष देशमुखांच्या तपासाला नवीन SIT टीममध्ये कोण कोण?

किरण पाटील (अपर पोलिस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर)

अक्षयकुमार ठिकणे (पोलिस निरीक्षक, भरारी पथक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे) अनिल गुजर (पोलिस उपअधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, बीड)

सुभाष मुठे (पोलिस निरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, बीड)

दीपाली पवार (हवालदार, सीसीटीएनएस, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

शर्मिला साळुंखे (पोलिस हवालदार भरारी पथक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)