रात्री पुरेशी झोप घेऊन सुद्धा दिवसा आळस येत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी असतात. काहींना कामाच्या ठिकाणी डुलक्या लागतात. काहींना चकवा जाणवतो, तर काहींना काम करण्याची इच्छाच होत नाही. कामात पुरेसे लक्ष लागत नाही. तुमच्या बाबतीत जर नियमित असे होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
रात्रीच्या जागरणानंतर दिवसा झोप येणे ही सामान्य बाब आहे. परंतु रात्री व्यवस्थित झोपल्यानंतर जर दिवसा सारखा आळस येत असले तर ही बाब काही सामान्य म्हटली जात नाही. याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. हा प्रकार हायपरसोम्नियाने देखील होऊ शकतो. या स्थितीत व्यक्तीला प्रमाणाच्या बाहेर झोप येते. वा हायपर सोम्नियाचे कारण काही वाईट सवयी आणि रोग असू शकतात.
---Advertisement---
मद्यपान: जास्त मद्यपान केल्याने झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे दिवसभर झोप येऊ शकते.
औषधांचा दुष्परिणाम : अनेकदा औषधांच्या साइड इफेक्टमुळे हायपरसोम्नियाचा त्रास होऊ शकतो, यामुळे दिवसा झोप अधिक येते.
स्नायू कमकुवत: जर शरीराचे स्नायू कमकुवत असतील तर वारंवार झोप येऊ शकते.
मधुमेह: डायबिटीज झाल्यानंतर शरीरात साखरेचे प्रमाण वाढले तर हायपरसोम्नियाचा जस कडू शकतो, डायविटीजमध्ये शरीर मलुकोजला ऊर्जत बदलण्यात असमर्थ असते. यामुळेही दिवसाचा थकवा आणि झोप येते. वारंवार तहान लागणे आणि लघवीला येणे, वजन कमी होणे बाची लक्षणे आहेत.
स्लीप अंपनिया : स्लीप अपनिया एक अशी स्थिती आहे. यात माह झोपेत असताना श्वास वारंवार धांवतो. त्यामुळे गाढ़ आणि सुखाची झोप येत नाही. या कारणाने दिवसाची झोप येते. बकया, डोकेदुखी आणि एकाग्रतेची कमी सारी लक्षणे दिसतात.
थायरॉइड : हायपोथायरायडिज्यमध्ये थायरॉइड ग्रंथी प्रभावित होतात. त्याचा प्रभाव मेटोबॉलिज्मवर पडतो. यामुळे सुस्ती, थकवा आणि वारंवार झोप येण्याची हा कारण समस्या वाढते. वजन वाढणे, थंडी वाजणे आणि केस गळणे याचे लक्षण आहे.
अॅनिमिया : अॅनिमियात हिमोग्लोबिन कमी असल्याने शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे थकवा आणि झोपेची समस्या वाटू शकते. हे आर्यन, व्हिटॅमिना बी-१२ वा फोलिक अॅसिडच्या कमतरतेने होऊ शकते.