शहरातील एकाच रस्त्यावरिल बेसमेंटचे सर्वेक्षण का?

जळगाव : शहरातील नेहरू चौक ते शास्त्री टॉवर दरम्यानच्या बेसमेंट धारकांचे प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेले सर्वेक्षण हि एवढीच पार्किंगची समस्या नसून जळगाव महानगरपालिकेने शहरातील इतर रस्त्यावरील बेसमेंट धारकांवर लक्ष द्यावे अशा तक्रारी आता नागरिकांमधून समोर येत असून याबाबत पदाधिकारी सुस्त आहे,अधिकारीही मस्त आहे,पण याचा त्रास मात्र नागरिकांना होत आहे असेही बोलले जात आहे.

नुकताच आटोपलेला दिवाळी सण, यानंतर झालेला जळगावातील रथ हे नागरिकांचे मुख्य आकर्षण असतांना, शहरात नवीन दुकानांचा थाटामाटात सजलेला  साज, यासाठी दुकानदारांनी बळकावलेली बेसमेंट मधील पार्किंगची जागा हा प्रश्न कायम राहिला असून महानगरपालिकेच्याच बाहेरच्या रस्त्यांवर अधिकारी,पदाधिकाऱ्यांना पार्किंगची समस्या दिसते का ? अशा प्रतिक्रिया आता जनतेतून समोर येऊ लागल्या आहे. जळगाव शहर ज्या पद्धतीने वाढतंय त्याच पद्धतीने उद्योग व्यवसायही वाढत असताना दुकानदारांना आपल्याजागेपेक्षा जास्त आणि फुकटात जागा वापरण्याचे प्रकार वाढत आहे.

याकडे कोणाचेही लक्ष नसून शहरातील बळीराम पेठ,गोलाणी मार्केट,फळ गल्ली,रिंग रोड,सर्फ बाजार,महात्मा गांधी मार्केट,सुभाष चौक,काँग्रेस भावनासमोरील रस्ता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फुले मार्केट केळकर मार्केट या भागातील दुकानदारांनी तर अक्षरशः बेसमेंट मधील पार्किंची जागा हडप करून पूर्वी बांधकामाचे असलेले प्लॅन बदललेले असल्याच्याही प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहे. पण या सर्वाना मनपातील काही पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने त्याकडे कोन्हीही लक्ष देत नाही असेही अनेकांनी सांगितले. तर अधिकारी जनतेच्या समस्या दुका करण्यासाठी नियुक्त असतांना ते देखील सतरा मजली वर बसून ए.सी ची हवा खाण्यात मस्त असल्याचे चित्र दिसून येते. यावर नागरिक मात्र या सर्व समस्यांमुळे त्रासला असून या नागरिकांचा एक गटच निर्माण झाला आहे. यामुळे शहरातील मूलभूत समस्यांबाबत कोणाकडे जायचे याबाबत नागरिकही शशांक आहे.