आपण हिंदू नेहमीच चुकीच्या विमर्शाचे बळी का ठरतो ?

नमस्कार. काल विजयादशमी निमित्त सालाबाद प्रमाणे रा.स्व.संघाच्या स्वयंसेवकांनी देशभरात सर्व ठिकाणी पथ संचलन केले. संघाच्या स्थापनेपासून मधल्या संघ बंदीची काही वर्षे सोडली तर हे ९७ वेळा प्रतिवर्षी झालेले संचलन असावे. माझे व्यक्तिगत स्तरावर सुमारे ४० वे संचलन असेल. यावर्षी मी ज्या भागात राहतो तेथील संचलन ज्या ज्या भागातून गेले त्याच भागातून पूर्वी काही वेळा संचलन गेल्याचे मला नक्की आठवते. जाणवलेला फरक असा कि या वर्षी सर्व सामान्य नागरीकांचा स्वागतातील उत्साही सहभाग मध्यम वर्गीय एरिया व वस्ती विभाग दोन्ही मध्ये प्रचंड वाढलेला होता. सर्वसामान्य नागरिक संघाकडे आणि त्यामुळे संघाच्या संचलनाकडे आपल्या हिंदू समाजाचे हितरक्षक आणि त्यांचा वार्षिक समाज भेटीचा कार्यक्रम या दृष्टीकोनातून पाहतो हे या वरून सिद्ध होते.

मात्र काल अशाच रत्नागिरी येथे निघालेल्या संचलनाच्या वेळी काही मुस्लीम समाजातील लोकांनी एकत्र जमून संचलन जात असताना अल्लाहू अकबर अशा घोषणा दिल्या. तिथे पोलीस उपस्थित होते त्यांनी जमावावर नियंत्रण ठेवले होते आणि त्या संचलनात सहभागी झालेल्या शूर स्वयंसेवक बंधूनी देखील या जमावाकडे साफ दुर्लक्ष करीत अजिबात विचलीत न होता शांतपणे संचलन सुरु ठेवल्याचे उपलब्ध व्हिडीओ वरून स्पष्ट दिसते आहे. मी व्यक्तिश: रत्नागिरी येथे चौकशी केली असता संचालन ठरलेल्या मार्गानेच पुरे झाले आहे असे कळले.

मात्र आम्ही संचलनात सहभागी झालेले स्वयंसेवक आपापल्या घरी पोहोचायच्या आताच सोशल मिडीयावर रत्नागिरीच्या घटनेचे अर्धवट वृत्त कळलेले काही फेसबुकी हिंदू जोरदार ज्ञान पाजळताना दिसले. आपल्या अफाट कल्पनांच्या लढाया लढताना दिसले. उदाहरणा दाखल काही वाक्ये पहा. “संघाच्या दरवर्षीप्रमाणे निघालेल्या विजया दशमी संचलनाचा पोलीस परवानगी मिळालेला मार्ग मुसलमान समाजाने रोखला. संघाचे संचलन वेगळ्या मार्गाने वळवण्यात आले.” दुसरा फेसबुकी हिंदू म्हणतो “ सर्वाना आता कळून चुकले आहेकी संघ फक्त दंड फक्त जमिनीवर आपटतो. दुसऱ्याच्या  टाळक्यात तो आपटण्याची संघाची ताकत नाही.” एवढ्यावर न थांबता एक दीड शहाणा पुढे म्हणतो “नुसत्या वल्गना आणि माझ्याकडे ठासून शहाणपण आहे याचे प्रदर्शन आता मोहनराव भागवत यांनी बंद करायला हवे.” तर अनेक लोकांनी “ विरोध करणारांचा आणि हा तमाशा थंडपणे बघणारांचा वेगळा विचार हिंदू समाजाने करायला हवा. हा प्रश्न व्यापक हिंदू समाजावर येऊ घातलेल्या संकटाची नांदी आहे.” अशीहि मते मांडलेली दिसतात ज्यात अनेकजण संघ स्वयंसेवक आहेत. बहुतेक सर्वांनी या प्रश्नावर “हिंदू समर्थक सरकार असूनही हि घटना कशी घडली?” असे प्रश्नचिन्ह उभे केलेले दिसते.

या निमित्ताने माझे पुढील मुद्दे विचारार्थ मांडीत आहे.

१) रत्नागिरीच्या घटनेत ज्या स्वयंसेवकांनी विरोधाला न जुमानता निडरपणे संचलन पूर्ण केले त्यांचे कौतुक कोणीही करताना दिसला नाही. त्यामुळे प्रथम त्या स्वयंसेवकांचे अभिनंदन व कौतुक करतो. आपण सर्वांनी पण असे कौतुक केले पाहिजे.

२) विरोध करणाया शांतीदुतांचा उद्देश बहुसंख्य हिंदुंच्या मनात भीती निर्माण करणे हाच आहे. आत्ताच्या घडीला ते फार शारीरिक हिंसेच्या पवित्र्यात नाहीत. त्याना भीतिचा माहोल तयार करायचा आहे. आणि आपल्या पैकी बहुतेक फेसबुकी हिंदू त्यांच्या या प्रयत्नात जाणते/अजाणतेपणाने त्याना सहाय्य करतात. त्यामुळे या पुढे अशी घटना घडली कि फार काही अघटीत घडले आणि मोठे संकट आले अशी मानसिकता न ठेवता आम्ही नक्की उत्तर देऊ अशी मानसिकता दाखवण्याची व प्रत्यक्षात तयार करण्याची गरज आहे.

३) २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकारला हरवण्याचा आपला डाव फसल्यावर देशभरात शांतीदूत समाजाकडून खोडसरपणा करून हिंदुना भडकवण्याचा पद्धतशीर  प्रयत्न ठिकठीकाणी सुरु असलेला दिसतो आहे. स्थानिक स्तरावर सारसबागेत नमाज पठणाचा प्रयत्न हे मी अनुभवलेले उदाहरण देता येईल. असेच प्रकार गरबा कार्यक्रमाला जाणाया महिलांवर गुजरातेत काही ठिकाणी झालेली दगडफेकीच्या रूपाने पुढे आलेले आहेत. अशा प्रयत्नाना स्थानिक हिंदुनी योग्य उत्तर दिल्यास ते थंड पडतात हे लक्षात आले आहे. सारसबागेतील नमाजपठाण हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे जसे शांतीदूत समाज स्थानिक ठिकाणी एकत्र येऊन खोड्या काढतो तसे स्थानिक हिंदुनी एकत्र येऊन त्या खोड्याना उत्तर देणे हा एकमेव मार्ग आहे. उत्तर देताना फेसबुकवर हिंदुत्वाचे ज्ञान देणा-या शहाण्याना पण आवर्जून बोलवावे.

४) मागील इतिहास लक्षात घेता प्रत्यक्ष शारीरिक हल्ल्या पेक्षा मानसिक आघाताचा परिणाम हिंदुंवर फार परिणामकारक ठरलेला दिसून येतो. त्या मुळे या पुढे हिंदू समाजमन खंबीर व कणखर करण्यावर सर्व हिंदुनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. सर्व हिंदुनी अशा प्रसंगी त्वरित एकत्रित येऊन त्या कुटुंबाला/ वस्तीला/ संघटनेला मदत दिली पाहिजे.

५) अशा घटनेच्या वेळी हिंदुत्वाच्या कोणत्याही प्रत्यक्ष कामात सहभाग नसलेल्या हिंदुनी शांत बसणे आवश्यक आहे. विशेष करून हिंदुत्वाचे काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांना हिणवण्याचे काम त्यांनी करू नये. त्याना कोणताही नैतिक अधिकार नाही.

मित्रानो आपल्या हिंदू समाजाला जागरूक करण्यासाठी, वाचवण्यासाठी हि पोस्ट सर्व हिंदूंपर्यंत पोहोचवा.

-लेखक. विनायक आंबेकर