प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गिरणातून वाळूची सर्रास लूट, नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांसमोर वाळू चोरांचे आव्हान

by team

---Advertisement---

 

जळगाव – जिल्ह्यात यंदा आर्थिक वर्षात वाळू गटांचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे कोणत्याही वाळू गटातून वाळू वाहतूकीचे पास निर्गमित नाहीत. असे असले तरी जिल्ह्यात कमी अधीक प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत असून दोन दिवसापूर्वीच महसूल कर्मचाऱ्याच्या अंगावर अवैध वाळूचे ट्रॅक्टर नेत त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला गेला. तर आज भरदिवसा गिरणा नदीपात्रात ट्रॅक्टरचा तांडाच्या तांडा प्रशासनाच्यास नाकावर टिच्चून अवैध वाळूचा उपसा करीत असल्याचे दिसून आले आहे. एकूणच नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांसमोर अवैध वाळू वाहतूकदारांनी खुले आव्हान दिले असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात गतवर्षी 29 वाळू गटांचा ई ऑक्शन लिलावापैकी फक्त चाळीसगाव तालुक्यात रहिपूरी येथील गटातून वाळू उपसा निविदा मंजूर होती. तर जळगाव तालुक्यातील गटासाठी कोटात याचीका दाखल असल्याने वाळू उपसा बंद असून इतर ठिकाणी देखील वाळू गट उपसा बंद होता. परंतु रात्री बेरात्री अनेक डंपर, ट्रॅक्टर टिप्परव्दारे अवैध वाळू वाहतूक केली जात होती.

तर यंदा 2025-26 अंतर्गत इ ऑक्शन लिलाव जाहिर करण्यात येवून तीन ते चार वेळा मुदतवाढ व पुनर्लिलाव करण्यात आले परंतु एकही निविदा दाराने प्रतिसाद दिलेला नाही. या उलट अवैध वाळू वाहतुकीला निर्ढावलेल्यांकडून अनेक वाळू गटांमधून अवैध उपसा केला जात आहे. यात वर पासून तळगाळापर्यंतच्या प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्याच वरदहस्तामुळे अवैध वाळू उपसा मोठया प्रमाणावर केला जात आहे.

पीएम आवास योजनेसाठी काही गटातून मोफत वाळू शासनाकडून पुरविली जात आहे. तसेच काही ठिकाणी रस्ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे याचा फायदा घेत निर्ढावलेले अवैध वाळू वाहतूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक केली जात आहे.
तत्कालिन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या काळात काही प्रमाणात का होईना, तोंडदेखला दंडकारवाई करत मिलीजुली सरकार नुसार बऱ्याच ठिकाणी अवैध वाळू शासकिय पुरवठा नावावर रात्रंदिवस उपसा केला गेल्ाा असला तरी प्रशासन पातळीवरून 200 वाहनांवर जप्ती कारवाईसह 2 कोटीहून अधिक दंड तर सप्टेंबर अखेर 32 कोटीं 93 लाखाहून अधिक रकमेची दंडात्मक कारवाई करीत महसूल शासन तिजोरीत जमा झाला आहे.

रोहन घुगे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून घुगे यांनी पदभार घेऊन दोन दिवस झाले नाहीत तोच एका महसूल कर्मचाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून जळगाव शहरातील बांभोरी पुलाजवळून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा करीत एक प्रकारे नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांना वाळू चोरट्यांनी आव्हानच दिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---