---Advertisement---

Pachora News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीकडू सतत छळ, अखेर विवाहितेने स्वतः ला संपवलं

by team
---Advertisement---

शहरातील आशीर्वाद ड्रीम सिटी येथे विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. वैशाली पाटील (वय ४३) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेप्रकरणी मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात विवाहितेचा पती व सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पाचोरा पोलिसात मृत विवाहितेचा भाऊ गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘माझी बहीण वैशाली लग्नानंतर सहा ते सात महिने उत्तम राहिली. परंतु त्यानंतर तिच्या पती अनिल पाटील आणि सासू छबाबाई पाटील यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरवात केली. तू मोबाईलवर कोणाशी बोलतेस ? तुझे काही संबंध आहे का? असे प्रश्न विचारत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ, केला.

हेही वाचा : …पण मला जिवंत ठेव दादा; स्वारगेट अत्याचार प्रकरणात पीडितेचा पोलिसांत जबाब

याविषयी मृत वैशालीने तिच्या भावाला ‘सासरच्या जाचामुळे मी. त्रस्त आहे, असेही कळविले होते.’ भावाने तिला सावध राहण्यासाठी सांगितले होते की, ‘तू काही टेन्शन घेऊ नकोस, टोकाचे पाऊल उचलू नकोस.’ परंतु २ फेब्रुवारीच्या सायंकाळी फिर्यादीला त्याचा भाचा रोहित पाटील याने फोन करून आईने फाशी घेतली आहे,’ अशी माहिती दिल्याने या माहितीवरून भावाने तत्काळ पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पंख्याला लटकलेला विवाहितेचा मृत देह खाली उतरवून अॅम्बुलन्सच्या सहाय्याने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला या ठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या या घटनेप्रकरणी मृत विवाहितेचा भाऊ गजानन पाटील यांनी पाचोरा पोलिसात दिलेल्या फिर्याद वरून रविवारी रात्री मृत विवाहितेचा पती अनिल पाटील व सासू छबाबाई पाटील या दोघांविरोधात आत्म हत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी अनिल पाटील यास सोमवारी अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या म ार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment