---Advertisement---

टाटा समूहातील या कंपनीचे गुंतवणूकदार मालामाल होणार? कंपनीने केली मोठ्या गुंतवणुकीची घोषणा

by team
---Advertisement---

Tata Power : टाटा समूहाची कंपनी – टाटा पॉवर संदर्भात टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा यांनी महत्वाची माहिती दिली आहे. कंपनी 2030 पर्यंत 32 GW पर्यंत ऑपरेटिंग क्षमता दुप्पट करण्यासाठी सुमारे 1.46 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.

काय आहे कंपनीचे लक्ष्य ?

2030 कंपनीचे लक्ष्य 31.9 गिगावॅट्स पर्यंत ऑपरेशनल क्षमता वाढवण्याचे आहे, ज्यामध्ये 23 गिगावॅट वाट अक्षय उर्जेचा असेल. सिन्हा म्हणाले की, टाटा पॉवर ऊर्जा क्षेत्राकडे पाहण्याचा देशाचा दृष्टीकोन लक्षात घेऊन पारेषण क्षेत्रातही काम करत आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीने ट्रान्समिशन लाइन क्षमता 4,633 CKM (सर्किट किलोमीटर) वरून 10,500 CKM पर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे. तसेच ग्राहक संख्या 1.25 कोटींवरून चार कोटीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

टाटा पॉवरने 2025-30 या आर्थिक वर्षासाठी 1,46,000 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचे नियोजन केले आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी भांडवली खर्च 21,000 कोटी रुपये आहे आणि पुढील आर्थिक वर्षासाठी तो 26,000 कोटी रुपये आहे. या कालावधीत आपल्या भांडवली खर्चाच्या 60 टक्के नूतनीकरण ऊर्जेवर खर्च केला जाईल, असे ते म्हणाले.

टाटा पॉवर शेअरची स्थिती
टाटा पॉवरच्या शेअरबद्दल बोलायचे झाले तर शुक्रवारच्या व्यव्हारात 1.77% ने वाढून 439.45 रुपयांवर पोहोचला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये या शेअरची किंमत 494.85 रुपयांवर गेली होती. हा कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.तर 292.25 हा स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक आहे.

टीप : शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment