राहुल गांधी अमेठीतून नाहीतर येथून लढणार निवडणूक ?

गांधी घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या जागांसाठी काँग्रेसने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. दरम्यान,  काँग्रेस नेते राहुल गांधी अमेठीऐवजी रायबरेलीमधून निवडणूक लढवू शकतात.

त्याचबरोबर अमेठीतून भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात काँग्रेस केएल शर्मा यांना उमेदवारी देऊ शकते. पक्ष आज गुरुवार २ मे मे रोजी दुपारी यूपीच्या दोन्ही जागांसाठी उमेदवारांची घोषणा करू शकतो.

प्रियांका गांधी कुठून निवडणूक लढवणार?
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि त्यांची आई सोनिया गांधी यांच्या सल्ल्यानुसार राहुल गांधी यांनी आपल्या निर्णयावर फेरविचार केल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रियांका गांधी रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, सोनिया गांधींनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर काँग्रेस प्रियंका गांधींना रायबरेलीतून तिकीट देऊ शकते, अशी चर्चा आतापर्यंत राजकीय वर्तुळात होती.

हा निर्णय धक्कादायक आहे कारण राहुल गांधी 2004 ते 2019 पर्यंत अमेठीचे खासदार आहेत. त्यांनी केरळमधील अमेठी आणि वायनाड मतदारसंघातून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, पण अमेठीमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून निवडणूक हरली. यावेळीही राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवली आहे.

मात्र, अमेठी आणि रायबरेलीमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. दोन्ही जागांवर उमेदवारी प्रक्रिया ३ मेपर्यंत सुरू राहणार आहे. स्मृती इराणी यांनी अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वास्तविक, ‘इंडिया’ या विरोधी आघाडीचा भाग असलेला समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससोबत निवडणूक लढवत आहे. युतीमध्ये काँग्रेसला यूपीमध्ये 80 पैकी 17 जागा देण्यात आल्या आहेत. या 17 जागांमध्ये अमेठी आणि रायबरेलीचा समावेश आहे.