---Advertisement---
जात, भाषा, प्रांत, प्रदेश आणि लिंग आर्दीच्या आधारावर हिंदू समाजातील विविध घटकांना विभाजित करणाऱ्या शक्तींविरुद्ध एकजूट करण्याचा, तसेच मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याचा ठराव अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय व्यवस्थापन समितीच्या दोनदिवसीय बैठकीत समारोपप्रसंगी करण्यात आला, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोककुमार वर्मा यांनी दिली.
शहरातील एमआयडीसीतील बालाणी लॉन्सवरील नवीन इमारतीत रविवारी (२० जुलै) दुपारी अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोककुमार वर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी संवादात जळगावात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील
त्रकर व बैठकीतील हिंदू मंदिरांवरील शासन नियंत्रणमुक्त करणे, हिंदू समाजाला विभाजित करणाऱ्या शक्तींविरुद्ध लढा उभारणे यांसह विविध मुद्यांवर ठराव केल्याबाबत माहिती दिली.
बैठकीत देशातील धर्मांतर, युवकांमधील व्यसनाधीनता, देशातील दहशतवाद यांसह जात, भाषा, प्रांत, प्रदेश व लिंग आर्दीच्या आधारावर हिंदू समाजातील विविध घटकांना विभाजित करणाऱ्या शक्ती, तसेच देशातील प्रसिद्ध मंदिरांवर राज्य केंद्र शासनाचे नियंत्रण व व्यवस्थापन हे हिंदू समाजाकडे राहावे या प्रमुख मुद्यांवर चर्चामंथन झाल्याचे श्री. वर्मा यांनी सांगितले.
हिंदू समाजाने आता मंदिरे सरकारी नियंत्रणात राहणार नाहीत, असा संकल्प केला आहे. आता समाज कोणत्याही किमतीत त्यांना मुक्त करेल. काही हिंदूविरोधी प्रवृत्तींमागे विस्तारवादी चर्च, कट्टरपंथी इस्लाम, मार्क्सवाद, धर्मनिरपेक्षता आणि बाजार शक्ती वेगाने
सक्रिय आहेत. यासाठी परकीय निधी प्राप्त होत आहे.
तथाकथित पुरोगामी, धर्मांतर शक्ती आणि भारतविरोधी जागतिक गटही सक्रिय आहेत. त्यांचे अंतिम ध्येय हिंदू समाजाचे तुकडे करणे आणि भारताच्या मुळांवर हल्ला करणे आहे. हिंदू एकतेवरील हल्ल्यांना योग्य उत्तर देऊच. यासोबतच जात, भाषा, प्रांत, प्रदेश आणि लिंग आर्दीच्या आधारावर हिंदू समाजातील विविध घटकांना विभाजित करणाऱ्या शक्तीविरुद्ध लढा दिला जाईल.
या ठरावात हिंदू समाजाला विभाजित करणाऱ्या शक्तींना ओळखण्याचे आणि त्यांच्यातील भेदभावांना मुळापासून नष्ट करण्याचे आवाहन केले आहे, तसेच देशातील केंद्र व राज्य सरकारांना ‘अभ्यासक्रमात नैतिक शिक्षणा’चा समावेश करण्याचे आवाहन केले आहे, असे श्री. वर्मा यांनी नमूद केले आहे.
सप्टेंबरमध्ये ‘मंदिर स्वातंत्र्य चळवळ’ उभारणार
प्रसिद्ध मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी बैठकीत व्यापक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. देशभरात तब्बल २० हजारांवर प्रसिद्ध मंदिरे आहेत. याअंतर्गत हिंदू समाजाचे प्रतिनिधी ७ ते २१ सप्टेंबरदरम्यान ‘मंदिर स्वातंत्र्य चळवळ’ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी विश्व हिंदू परिषद पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ देशभरातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटतील आणि यासंदर्भात निवेदनही देतील. प्रत्येक महानगरात बुद्धिजीवींच्या बैठका घेऊन यासाठी पाठिंबा वाढविला जाईल.
दुसऱ्या टप्प्यात, देशातील सर्व प्रमुख विधानसभांच्या अधिवेशनांदरम्यान, आमदारांशी व्यापक संपर्क साधण्यात येईल. जेणेकरून ते त्यांच्या राज्य सरकारांवर या उद्देशाने योग्य दबाव आणू शकतील आणि मंदिरे नियंत्रणमुक्त करू शकतील, असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोककुमार वर्मा यांनी सांगितले. हिंदू समाजासह सर्व कार्यकर्ते, पूज्य संत आणि सामाजिक संघटनांना समाजाला विभाजित करणाऱ्या या शक्तींना ओळखण्याचे आणि त्यांच्यातील भेदभाव दूर करून एकजूट राहण्याचे आवाहन करण्यात आले.