Wipro Stock: शेअर बाजारात आज विप्रोच्या शेअर्समध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. सकाळी ट्रेडिंग सत्रात विप्रो शेअरची किंमत निम्म्यावर आल्याचे गुंतवणूकदारांना दिसून आले. आज बाजाराच्या सुरवातीला त्याच्या मूळ किमतीपासून म्हणजेच 550 वरून 295.35 रुपयांवर उघडला. ज्यामुळे गुंतवणूकदारांना आज आपला पोर्टफोलिओ 50% डाउन झाल्याचं पाहायला मिळाले.
विप्रोच्या शेअरची किंमत निम्मी का झाली?
विप्रो लिमिटेडने काही दिवसांपूर्वी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सची भेट दिली होती. कंपनीने प्रत्येकी एक बोनस शेअर दिला होता.तो बोनस आज कालबाह्य झाला आहे. याचा परिणाम भावावर दिसून येत आहे. शेअरची किंमत निम्म्यावर आली आहे. पण गुंतवणूकदारांना घाबरण्याची गरज नाही कारण जितके शेअर त्यांच्याकडे असतील ते आता दुप्पट झाले आहेत.
बोनस शेअर म्हणजे काय?
बोनस शेअर्स म्हणजे कंपनीने तिच्या विद्यमान भागधारकांना “बोनस” म्हणून दिलेल्या समभागांची अतिरिक्त संख्या. त्या तिमाहीत चांगला नफा मिळवूनही कंपनी आपल्या भागधारकांना लाभांश देण्याच्या स्थितीत नसताना ती भागधारकांना देते. बोनस शेअर्सला बोनस इश्यू असेही म्हणतात
बोनस इश्यूचा काय परिणाम होतो?
जेव्हा बोनस शेअर्स जारी केले जातात, तेव्हा शेअर्सची किंमत जारी करण्याच्या गुणोत्तरानुसार कमी होते, परंतु समभागांचे एकूण गुंतवणूक मूल्य समान राहते. शेअरधारकांना प्रत्येक विद्यमान शेअरसाठी 1 बोनस शेअर मिळेल. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे आधी विप्रोचे 100 शेअर्स असतील तर बोनस इशुमुळे आज त्याचे तुमच्याकडे 200 शेअर्स असतील. तथापि, बोनस इश्यूमुळे गुंतवणुकीचे मूल्य बदलत नाही कारण शेअरच्या किमती त्यानुसार समायोजित होतात.
बोनस इश्यूमुळे, कंपनीच्या एकूण इक्विटी शेअर्सची संख्या वाढते, परंतु शेअरचे मूल्य त्याच रकमेने कमी होते. उदाहरणार्थ, विप्रोने 1:1 बोनस जारी करण्याची घोषणा केली. याचा अर्थ असा की प्रत्येक विद्यमान भागधारकाला त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक समभागामागे एक नवीन पूर्ण पेड-अप शेअर मिळेल. बोनस इश्यूचा उद्देश शेअरची तरलता वाढवणे हा आहे. हे नवीन बोनस शेअर्स कंपनीच्या मुक्त राखीव आणि अतिरिक्त रकमेतून जारी केले जातात.
काही ट्रेडिंग प्लॅटफॉर्म जुनी (असंयोजित) किंमत प्रदर्शित करू शकतात. यामुळे विप्रोचा स्टॉक सुमारे 50% घसरला आहे असा गैरसमज होऊ शकतो, तर हा केवळ बोनस इश्यू ॲडजस्टमेंटचा परिणाम आहे.
गुंतवणूकदारांना फायदा काय?
बोनस इश्यूचे अनेक फायदे आहेत, प्रथम, गुंतवणूकदारांसोबत विप्रो शेअर्सचे प्रमाण वाढेल. बोनस इश्यूनंतर, जरी शेअर्सची किंमत कमी झाली तरी, भागधारकांच्या एकूण मूल्यामध्ये कोणताही बदल होणार नाही कारण त्यांच्याकडे असलेल्या समभागांची संख्या दुप्पट होईल.
दुसरे, त्याचा लाभ लाभांशावर उपलब्ध आहे. पूर्वी तुम्हाला १०० शेअर्सवर लाभांश मिळत होता (100 शेअर्स म्हणूया), आता तुम्हाला 200 शेअर्सवर लाभांश मिळेल. आणि विप्रोची चांगली गोष्ट म्हणजे ती एक आयटी कंपनी आहे आणि आयटी कंपन्या सहसा दरवर्षी लाभांश देतात. ज्या गुंतवणूकदारांकडे 2 डिसेंबरपर्यंत विप्रोचे शेअर्स आहेत त्यांना लवकरच बोनस शेअर्स त्यांच्या डीमॅट खात्यात जमा केले जातील.