हेमा मालिनी यांच्या सोबत झाले एअरवेजच्या विमानात गैरवर्तन

मुंबई: बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री  हेमा मालिनी यांच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. कतार एअरवेजच्या फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या प्रवाशांनी हेमा मालिनी यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. हेमा मालिनी यांच्याशी गैरवर्तन केले ज्यामुळे अभिनेत्री खूपच नाराज आहे.

हेमा मालिनी या मुंबई विमानतळावरून दोहाला जात असताना ही घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार हेमा मालिनी फ्लाइटमध्ये झोपल्या असताना विमानात उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनी त्यांच्या फोटो काढण्याचा प्रयत्न केला.रात्री २ वाजता हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

एअरलाइन्समध्ये उपस्थित असलेल्या क्रू मेंबर्सनीही या घटनेकडे लक्ष दिले नाही.  हेमा मालिनी यांनी केलेल्या तक्रारीनंतर कतार एअरवेजकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हेमा मालिनी कतार एअरवेजच्या बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत होत्या.