jalgaon news: तरुणासह आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण

जळगाव :  क्रॉक्रिटीकरण कामाच्या ठिकाणावरुन मटेरीयल खड्डा भरण्यासाठी घेतल्याच्या कारणावरुन तरुणासह भांडण सोडविण्यास आलेल्या त्याच्या आईला मारहाण केल्याची घटना गवळीवाडा तांबापुरा परिसरात शनिवार, 30 रोजी सायंकाळी घडली. दिनेश राजू भोई (37) हे व्यावसायिक असून गवळीवाडा तांबापुरा येथे राहतात. नाना हटकर याने दिनेश राजू भोई यांना शिवीगाळ करीत भांडणाला सुरुवात केली. त्यानंतर नाना याची मुले आदेश तसेच राहुल हे याठिकाणी धावून आले. तिघांनी दिनेश यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी पोटात मारहाण केली. हा वाद मिटविण्यासाठी दिनेश याच्या आई तुळसाबाई आली असता तिघांनी शिवीगाळ करून त्यांनाही लाथाबुक्कयांनी मारहाण केली. याप्रकरणी तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेकॉ सचीन पाटील करत आहे.