---Advertisement---

Nandurbar Crime : अंगणवाडी मदतनीस म्हणून अर्ज केल्याचा राग, न्यायालयाच्या आवारातच महिलेला मारहाण

---Advertisement---

---Advertisement---

नंदुरबार : धडगाव न्यायालयाच्या आवारात महिलेला मारहाण केल्याची घटना समीर आली आहे. जखमीबाई दुवाल्या पावरा असे मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, त्यांनी निमखेडी येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून अर्ज केल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमीबाई पावरा यांनी निमखेडी गावातील अंगणवाडी केंद्रात मदतनीस पदासाठी अर्ज केला होता. यातून त्यांची निवड झाली होती. दरम्यान, २१ जुलै रोजी जखमीबाई धडगाव न्यायालयात कामानिमित्त गेल्या होत्या. या ठिकाणी निमखेडी गावातील मोसंबी सामसिंग पावरा (वय २५) या त्यांच्या कुटुंबीयांसोबत आल्या होत्या. यावेळी मोसंबीबाई हिने जखमीबाई यांच्यासोबत वाद घातला.

या वादादरम्यान मोसंबीबाई सोबत असलेल्यांनी त्यांना मारहाण केली. प्रसंगी तिचा बचाव करण्यासाठी नातेवाईक, वडील आणि भाऊ असे आले असता, त्यांना ओंकार पावरा, मोसंबी पावरा, सामसिंग पावरा, हारसिंग पावरा, उदयसिंग पावरा, सुकलाल पावरा, जामसिंग पावरा (सर्व रा. निमखेडी) यांनी सळई, लाकडी दांडके वैराग्या दुबाल्या पावरा, दिनेश दुबाल्या आणि दगडाने मारहाण करुन जखमी केले.

या मारहाणीत जखमीबाई यांच्यासह दुबालाल जुग्या पावरा, पावरा हे जखमी झाले. या प्रकरणी जखमीबाई यांनी धडगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ओंकार लुला पावरा, मोसंबी सामसिंग पावरा, सामसिंग ओंकार पावरा, हारसिंग ओंकार पावरा, उदयसिंग ओंकार पावरा, सुकलाल लुला पावरा, जामसिंग लुला पावरा यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र जगताप करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment