---Advertisement---

गाईच्या दुधामुळे महिलेचा मृत्यू, गावात खळबळ, नेमकं काय घडले?

by team
---Advertisement---

गायीचे दूध पिल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चाळीस वर्षीय महिलेने रेबीज संक्रमित गायीचे दूध पिल्यामुळे मृत्यू झल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

एका ४० वर्षीय महिलेचा रेबीज संसर्गाने मृत्यू झाला आहे. हा संसर्ग थेट प्राण्यांच्या चाव्याव्दारे नाही, तर संक्रमित गायीचे कच्चे दूध प्यायल्याने झाला. काही महिन्यांपूर्वी, पाळीव गायीला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला, ज्यामुळे गायीला रेबीजचा संसर्ग झाला. सुमारे दोन महिन्यांपूर्वी, या संक्रमित गायीने एका वासराला जन्म दिला. गायीचे पहिले दूध पारंपारिकपणे परिसरात वाटले जात होते. गाईची प्रकृती अधिक खराब होऊ लागल्यानंतर पशु चिकित्सककडून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गाईला रेबीजचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गाईचे दूध पिणाऱ्यांनी रेबीजचे इंजिक्शन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

गाईच्या मालकिनीने आणि कुटुंबाने तात्काळ रेबीजचे इंजिक्शन घेतलं. पण शेजारी राहणाऱ्या ४० वर्षीय सीमा यांनी इंजिक्शन घेतलं नाही. काही दिवसानंतर सीमा यांची प्रकृती बिघडली. त्यांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या रिपोर्ट्सनुसार, सीमा यांचा मृत्यू रेबीजमुळे झाला.

ग्रेटर नोएडाच्या जेवर भागातील थोरा या गावातून हि घटना समोर आली आहे, गावात घडलेल्या या धक्कादाय घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे.




Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment