---Advertisement---
यावल : येथील एक महिला घरात असताना विषारी सापाने तिला दंश केल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना गाडगे नगर परिसरात घडली असून याची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, निर्मलाबाई शंकर वडर (५६, रा. गाडगे नगर, यावल) ह्या राहत होत्या. रविवार, २२ सप्टेंबर रोजी त्या सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास आपल्या घरात असताना त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या मध्यभागी अत्यंत विषारी सापाने दंश केला. यात त्या बेशुद्ध झाल्यात. ही बाब परिवारातील इतर सदस्यांच्या लक्षात आली. यानंतर समाजबांधवांनी त्यांना उपचारासाठी तात्काळ यावल ग्रामीण रुग्णलयात दाखल केले.
यावेळी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून सर्पदंश झालेल्या निर्मलाबाई वडर यांना मृत घोषीत केले. मयत निर्मलाबाई वडर यांच्या मृतदेहावर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची नोंद मयताचा मुलगा रवीन्द्र शंकर वडर (३०,वर्ष) यांनी यावल पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजेन्द्र पवार हे करीत आहे.