Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, ग्रामस्थांकडून वनविभागाच्या वाहनाची जाळपोळ

भंडारा : येथील आमगाव दिघोरी गावातील एका महिलेवर  बुधवारी संध्याकाळी वाघाने हल्ला केल्याची घटना घडली आहे.  शेतात तूर कापत असतांना वाघाने हल्ला केला आहे. या हल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. नंदा किसन खंडाते (वय ५०) असं मृत महिलेचं नाव आहे. 

हल्ल्यानंतर वाघ मृतदेहाजवळ बसून राहिला होता. नंदा खंडाते ही तूर कापण्यासाठी शेतात गेली होती. या दरम्यान, शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर अचानक हल्ला चढविला या हल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.  प्रयत्न केला. मात्र, वाघ तेथून गेला नाही. अखेर वाघांने महिलेच्या मृतदेहाजवळचं ठिय्या मांडल्यानं याची माहिती वनाधिकारी आणि पोलीस विभागाला दिली. 

हेही वाचा : Washington plane crash: अमेरिकेत प्रवाशी विमानाची हेलिकॉप्टरला धडक, पहा अपघाताचा VIDEO

घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर गावकर्यांनी घटनेची  माहिती वन विभागाला दिली. मात्र, वन विभागाचे कर्मचारी वेळीच घटनास्थळी पोहोचले नाही; असा आरोप करीत संतप्त ग्रामवासीयांनी घटनास्थळावर पोहोचलेल्या १० ते १५ वन कर्मचाऱ्यांना  मारहाण करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांचा रोष बघता वन कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवत सैरावरा पळाले. यानंतर या प्रकरणाला हिंसक वळण लागलं आणि संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या वाहनाची तोडफोड करून वाहन पेटवून दिलं. 

रात्री उशिरा मृत महिलेच्या मृतदेहाजवळ ठाण मांडून बसलेल्या वाघाला डॉट मारून बेशुद्ध करून त्याला जेरबंद केलं. यावेळी संतप्त ग्रामवासीयांनी महिलेचा मृतदेह जेरबंद केलेल्या वाघाच्या पिंजऱ्यासमोर ठेवत मृतक महिलेच्या कुटुंबियांना तातडीने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी या मागणीला घेऊन आंदोलन केलं. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नागरिकांची समजूत काढत रात्री उशिरा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आणि जेरबंद केलेल्या वाघावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी नेण्यात आलं.