---Advertisement---

Jalgaon News : आरोग्य विभागाचा कारभार पून्हा चव्हाट्यावर; रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू

---Advertisement---

जळगाव : रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने सर्पदंश झालेल्या ब्राह्मणशेवगे येथील उर्मिला देसले या महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिला दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही. दरम्यान, रुग्णवाहिका नसल्याने गैरसोय झाल्याची चार दिवसातील ही दुसरी घटना असून दुसऱ्या घटनेत तर एका महिलेलाच जीव गमवावा लागला आहे.

शिरसगाव व तळेगाव येथे रुग्णवाहिका नसल्याने तसेच त्यामुळे वैद्यकीय उपचार वेळेवर न मिळाल्याने तळेगाव येथील महिलेला नाहक त्रास सहन करावा लागला. या महिलेची खाजगी गाडीतच प्रसुती झाली होती. ही घटना ताजी असताना ब्राह्मणशेवगे येथील उर्मिला देसले नामक महिलेला सर्पदंश झाल्याने तसेच रुग्णवाहिका न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य विभागाचा कारभार यामुळे चव्हाट्यावर आला आहे.

प्रश्न ऐरणीवर


चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील रुग्णवाहिका तीन महिन्यांपासून चोपडा येथील रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे कारण देत चोपडा येथे नेण्यात आली आहे. दोन महिने उलटून गेल्यावरही रुग्णवाहिका सेवा बंद असल्यामुळे शिरसगाव येथील रुग्णवाहिका पूर्ववत करण्यासाठी मागील महिन्यात वेळोवेळी सोमनाथ माळी यांनी विनंती केली. मात्र दोन दिवसात पाठवतो. नवीन गाडी पुढील आठवड्यात येईल, मग पाठवतो, अशी उत्तरे देण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत ही रुग्णवाहिका परत आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---