---Advertisement---

Jalgaon Crime News: अज्ञात चोरटयांनी जळगावातील महिलेचे दागिने लांबविले

by team
---Advertisement---

जळगाव : पुणे ते जळगाव प्रवासा दरम्यान महिलेचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रवाशी महिलेच्या पर्स मधून ४ लाख ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील त्रंबक नगर येथे राहणाऱ्या महिला आशा विकास कुलकर्णी (५०) या पुणे येथे नातेवाईकांकडे गेले होते. त्यानंतर २३ मार्च रोजी त्या पुणे ते जळगाव लक्झरीने प्रवास करत असताना प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी ४ लाख ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरी झाल्याची बाब लक्ष्यात आल्या नंतर आशा कुलकर्णी यांनी २४ मार्च रोजी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सलीम तडवी करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment