तरुण भारत लाईव्ह । १२ मार्च २०२३। जिल्हा पत्रकार संघ आम आदमी पार्टी महिला आघाडी युवा अध्यक्ष अमृता नेटकर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त शनिवार रोजी शहरातील विविध पत्रकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून दैनिक लोकशाहीच्या संपादिका शांताबाई या होत्या प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जय श्री महाजन डॉक्टर केतकी पाटील डॉक्टर विजेता सिंग डॉक्टर सविता नंदनवार देशपांडे व्यासपीठ वर उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रारंभिक प्रस्ताविक आम आदमी पार्टीच्या महिला आघाडी युवा अध्यक्ष अमृतानेतकर यांनी करून देताना सांगितले की जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना जागृत करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले
या महिलांचा सत्कार करण्यात आला
सविता कानडे (तरुण भारत) मुग्धा भुरे (न्यूज अँकर तरुण भारत) प्रेरणा पाटील संतोष (पुण्यनगरी) दीक्षिता देशमुख (शौर्य) जागृती भावसार (न्यूज अँकर लोकशाही) निकिताभ भोई, कोमल पाटील, प्रांजल जगताप, कविता जोशी, दिपाली सोनवणे, मंगला साळुंखे
या महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला भारतभूमी ही महिलांच्या कर्तुत्वाने गाजलेली भूमी आहे कल्पकता मांडण्याची हातोटी महिलांमध्येच आहे महिलांशिवाय पुरुष अपूर्ण असून महिलांचा आणि तोही महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आल्याबद्दल यावेळी महापौर जय श्री महाजन यांनी आनंद व्यक्त केला यावेळी कायदे तज्ञ डॉक्टर विजेता सिंग यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की महिला व पुरुष यांची नाती म्हणजे सायकलीचे दोन चाकी आहेत त्यातील मागील शाखावर म्हणजे महिलांवर मोठी जबाबदारी असते मी टू आंदोलन अंतर्गत 2001 पासून महिलांनी बोलायला सुरुवात केली महिला अधिकाराची माहिती प्रत्येक महिलेला हवीच मोबाईल प्रत्येक महिलेकडे असावा आतापर्यंत महिलांना शोषित ठेवले गेले ते कमी होऊन विशेष कायद्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला आहे त्यानंतर गोदावरी परिवाराच्या डॉक्टर किती पाटील डॉक्टर सविता नंदनवार यांनाही समायोजित भावपूर्ण मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉक्टर जयश्री देवरे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले