महामानवांच्या जयंतीनिमित्ताने महिलांनी काढली मोटर सायकल रॅली

जळगाव :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह सोहळ्यास मोटारसायकल रॅली काढून शुक्रवार, १२ रोजी प्रारंभ करण्यात आला. समितीचे अध्यक्ष संदीप शिरसाठ व उप अध्यक्ष भारती रंधे यांच्या नेतृत्वात महिलांची रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली चे नियोजन भारती रंधे, निलू इंगळे, सुवर्णा तायडे, संगीता मोरे,सुजाता ठाकूर यांनी केले. यारॅलीत शहरातील विविध क्षेत्रातील महिलांनी सहभाग घेतला. यात माजी महापौर सीमा भोळे, माजी महापौर भारती सोनवणे, सरिता माळी -कोल्हे, मंगल पाटील , माजी नगरसेविका सपना सोनवणे, स्मिता वेध, शुभांगी बिऱ्हाडे, प्रतिभा शिंदे, लीना पवार, निवेदिता ताठे, निरंजना तायडे, रजनी इंगळे, भारती काळे, सोनाली रंधे, सीमा बिऱ्हाडे, मंगला बारी, नंदा बोदळे, कविता सपकाळे,त सेच आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, अजिंठा सोसायटी, तांबपुरा, शिवाजी नगर, शाम नगर, वाघ नगर तसेच सर्व धर्मसमभाव समितीच्या पदाधिकारी व भुसावळ व मुक्ताईनगर येथील भीमउत्सव समितीच्या महिला पदाधिकारी उपस्थित होते. यारॅलीसाठी मुकुंद सपकाळे, सतीश गायकवाड, विजय सुरवाडे, आशिष सपकाळे, गणेश पगारे समितीचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.