जिल्ह्यात १३ नगरपरिषदांवर ‘महिला राज’

---Advertisement---

 

राज्यासह जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची रणधुमाळी लवकरच रंगणार आहे. यात सध्याची मान्सून अतीवृष्टी नुकसान परिस्थिती पहाता जिल्हा परिषद पंचायत समित्यांऐवजी नगरपरिषद, पंचायतींच्या निवडणूकांनी बाजी मारली आहे. यात नगरपालिकांच्या निवडणूकांसाठी राज्यस्तरावरून मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली महिला नगराध्यक्षपदांसाठी आरक्षण जाहिर झाले आहे.

दिवाळीच्या दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची आचारसंहिता राज्यात लागू होण्याची शक्यता आहे, असे संकेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच दिले होते. त्यात आज सोमवार ६ ऑक्टोबर रोजी राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या महिला नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे.

यात जळगाव जिल्ह्यातील १९ नगरपरिषद नगरपंचायतीपैकी सुमारे १३ नगरपरिषदांवर महिलासाठी आरक्षण निघाले आहे.
अनुसूचीत जाती महिला यात भुसावळ, सावदा या दोन नगरपरिषद आहेत. अनुसूचीत जमाती महिलांसाठी भडगाव, एरंडोल आणि अमळनेर या तीन नगरपरिषद आहेत. तसेच ओबीसी महिलांसाठी चोपडा, नशिराबाद, वरणगाव या तीन नगरपरिषद ओबीसी प्रवर्ग महिला नगराध्यक्ष आरक्षणाचा समावेश आहे. तर पाच नगरपरिषदांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्ग यात धरणगाव, रावेर, जामनेर, यावल, पाचोरा या नगरपरिषदांवर महिला राज राहणार आहे.

चार नगरपरिषदा खुल्या गटासाठी

इतर नगरपरिषदांवर सर्वसाधारण उमदेवार यात चाळीसगाव पारोळा शेंदूर्णी आणि बोदवड असे आरक्षण आहे.

धुळे जिल्ह्यात ओबीसी प्रवर्गात महिलांसाठी दोंडाईचा वरवाडे आणि शिरपूर वरवाडे नगरपरिषद असे महिला आरक्षण जाहिर झाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर आणि शहादा नगरपरिषदेसाठी महिला ओबीसी, तर तळोदा नगरपरिषदेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्ग महिला आरक्षण जाहिर झाले आहे.

खानदेशात नगरपरिषद पंचायींमध्ये महिला आरक्षण जाहिर झाल्याने राजकिय घडामोडींसह युती आणि आघाडीची जुळवाजुळव बेरीज वजाबाकीची समीकरणांना वेग येणार असल्याचे चित्र आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---