जळगावात ठेकेदारांचे काम बंद आंदोलन; काय आहेत मागण्या ?

जळगाव : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात गुरुवारी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे काम बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘साबांवि’त पूर्ण झालेल्या कामाचे बिल ठेकेदारांचे अदा करावे, अशी मागणी करण्यात आली. याबाबत अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.

शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग जलजीवन मिशन विभाग तसेच जलसंधारण विभाग सारख्या ठिकाणी शासनाचे विभागाकडे ठेकेदारी पद्धतीने नुसार काम केले जाते. परंतु अद्यापपर्यंत ठेकेदारांचे गेल्या दोन वर्षांपासून पूर्ण केलेल्या कामांची बिले निघालेली नाही. त्यामुळे पुढील काम करण्यास त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिवाय यावेळी अनेकवेळा पत्रव्यवहार आंदोलन, निवेदने यांच्या माध्यमातून ठेकेदारांची पिले अदा करावी, यासाठी मागणी केली होती. परंतु शासन तसेच मंत्री व प्रशासनाकडून अद्यापपर्यंत बिल अदा करण्याबाबत कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही. त्यामुळे राहिलेली कामांची बिले ही तातडीने ठेकेदारांना देण्यात यावी, अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली.

दरम्यान, जोपर्यंत ठेकेदारांना केलेल्या कामाची बिले मिळत नाही, तोपर्यंत कामबंद राहील असा पवित्रा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभियंता राहुल सोनवणे यांनी घेतला आहे. प्रमोद नेमाडे, विकास महाजन, संजय पाटील, मिलिंद अग्रवाल, विजय बडे, प्रदीप पाटील, योगेश पाटील, उज्वलकुमार बोरसे, सुशीलकुमार डोंगरे, शेखर तायडे, श्रीराम चौधरी यांच्यासह इतर ठेकेदारांनी काम बंद आंदोलनात सहभाग नोंदवला होता.