---Advertisement---
भुसावळ : दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील एमओडी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अंमलबजावणीतील पक्षपाती धोरणांमुळे ही परिस्थिती उद्भवली असून, याविरोधात पॉवर स्टेशन बचाव समितीने १५ डिसेंबर रोजी वीज निर्मिती केंद्रासमोर जाणीव उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
समितीने सांगितले की, वीज निर्मितीवरील वाढता खर्च आणि एमओडी उत्पादनातील घट यामुळे प्रकल्पाच्या स्थैर्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे शासन आणि महावितरण प्रशासनाने तत्काळ सुधारात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचा आवाज कामगारांनी उठवला आहे. या उपोषणादरम्यान समिती काही महत्त्वाच्या मागण्या करणार आहे.
वीज निर्मिती खर्च कमी करण्यासाठी स्वतंत्र सुधारणा समिती स्थापन करावी, पीपीएमध्ये दुरुस्ती करून सरकारी प्रकल्पांकडून किमान १,००० मेगावॅट वीज खरेदी सुनिश्चित करावी, एमओडीवरील शंका दूर करण्यासाठी चौकशी समिती गठीत करावी, प्रकल्पाच्या नियमित आणि पारदर्शक संचालनासाठी आवश्यक धोरणात्मक सुधारणा कराव्यात, कामगारांनी स्पष्ट केले की, एमओडी उत्पादनातील घट आणि व्यवस्थापनातील कथित पक्षपातीपणा मुळे प्रकल्पाच्या भविष्यावर परिणाम होत आहे. सुधारणा न झाल्यास आंदोलन उग्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दीपनगर वीज प्रकल्पातील ही घडामोड राज्यातील ऊर्जा व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत असून, उपोषणानंतर शासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









