जागतिक कर्करोग दिन : कर्करोगविषयक उपलब्ध माहिती तसेच कर्करोगाचे निदान आणि उपचार यांत झालेली लक्षणीय प्रगती यांमुळे रोगप्रसारामध्ये कपात होणे अपेक्षित आहे. परंतु जागतिक आकडेवारीनुसार दरवर्षी कर्करोगाचे नव्याने निदान होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत भर पडत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कर्करोगाच्या माहितीचा प्रसार करून कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकते. यासाठी कर्करोग प्रतिबंधात्मक उपायांविषयी जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने जगभरातील कर्करोग संस्था आणि आरोग्य संघटना जागतिक कर्करोग दिवस साजरा करतात.
कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी सु. ७० % मृत्यू हे अल्पविकसित देशांमध्ये होत असल्याकारणाने अशा ठिकाणी कर्करोग आणि त्याचा प्रतिबंध याबद्दल जनजागृती करण्यासाठी जागतिक कर्करोग दिवस हे एक महत्त्वाचे साधन आहे.आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (Union for International Cancer Control, UICC) ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्करोगावर नियंत्रण राखण्यासाठी आणि पर्यायाने जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी कार्यशील असते. आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोग दिवसाचे आयोजन केले जाते. प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना जागतिक कर्करोग दिवसानिमित्त कर्करोगाशी निगडित रूपरेखा (Theme) जाहीर करते. या रूपरेखेला अनुसरून विविध आरोग्य संस्था आणि कर्करोग उपचार केंद्र यांद्वारे शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. या संस्थांद्वारे त्यांच्या संकेतस्थळांवर कर्करोगाविषयी माहिती प्रसारित केली जाते. आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना स्थानिक आरोग्य संस्थांच्या साहाय्याने संमेलने, व्याख्याने, प्रदर्शने तसेच निधी उभारणी कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते. काही देशांमध्ये आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांद्वारे ४ फेब्रुवारी किंवा त्या आठवड्यात कर्करोगविषयक विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. जागतिक कर्करोग दिवसानिमित्त सामूहिक आणि वैयक्तिक प्रयत्नांतून कर्करोगाचा जनजीवनावरील परिणाम कमी करता येऊ शकतो.
जागतिक कर्करोग दिनाच्या थीम
2022-2024 वर्षांची थीम ‘केअर गॅप बंद करा’ आहे जी देशातील उत्पन्न, वय, लिंग, वांशिकता इत्यादींच्या विविध गटांच्या लोकसंख्येला भेडसावणाऱ्या कॅन्सर केअर सेवांच्या प्रवेशातील फरक दूर करण्यावर लक्ष केंद्रित करते.2019-2021 मोहिमेची थीम होती ‘मी आहे आणि मी करू’. थीम नकारात्मक वृत्ती आणि घातक विश्वासाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते की कर्करोगाबद्दल काहीही केले जाऊ शकत नाही आणि त्याऐवजी आपल्या वैयक्तिक कृती शक्तिशाली आणि प्रभावशाली कशा असू शकतात हे प्रोत्साहन देते 2016 मध्ये, जागतिक कर्करोग दिनाने ‘आम्ही करू शकतो’ या टॅगलाइनखाली तीन वर्षांची मोहीम सुरू केली. मी करू शकतो.’, ज्याने कर्करोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी सामूहिक आणि वैयक्तिक कृतींच्या सामर्थ्याचा शोध लावला२०१६ पूर्वी, मोहिमेच्या थीममध्ये “नॉट बियॉन्ड अस” (२०१५) आणि “डिबंक द मिथ्स” (२०१४) यांचा समावेश होता.
वर्ष थीम
2022 -2024 ‘केअर गॅप बंद करा’
2019 – 2021 ‘ मी आहे आणि मी करू.’
2016 – 2018 ‘आम्ही करू शकतो. मी करू शकतो.’
2015 आमच्या पलीकडे नाही
2014 गैरसमज दूर करा
2013 कर्करोग मिथक – तथ्ये मिळवा
2012 चला एकत्र काहीतरी करूया
2010 – 2011 कर्करोग टाळता येतो
2009 – 2010 ‘मला माझे निरोगी सक्रिय बालपण आवडते’
भारतामध्ये सन २०१४ पासून ७ नोव्हेंबर यादिवशी राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस साजरा करण्यात येतो.